-->
महानुभाव पंथात अंधश्रद्धा / बुवाबाजीला थारा नाही..- महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव.

महानुभाव पंथात अंधश्रद्धा / बुवाबाजीला थारा नाही..- महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव.


•महानुभाव पंथाच्या शास्त्रात भ्रष्ट धनाची निंदा केली आहे..

• महानुभाव पंथाच्या 'असतीपरीत' निरालंबी हे तत्व सांगितले आहे. या शास्त्र वचनामुळे...

"सापताहीक जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

  भंडारा :- धनाची लालसा हिच अंधश्रद्धा व बुवाबाजीच्या रोगाचे मूळ आहे. धन लालसेतून भ्रष्ट मार्गाने धनाचा संचय. धनामुळे अहंकार. अहंकाराने उन्मत्त होऊ भ्रष्ट मार्गाने धन संचय करण्याचे व्यसन. या भ्रष्ट धनातून जगातील प्रत्येक अष्टभोग प्राप्त करण्याची उर्मी व नंतर सारासार विवेक नष्ट होऊन अधःपतन व शेवटी सर्वनाश. सर्व प्रकारच्या अधपतनाचे भ्रष्ट मार्गाने कमविलेले धन हेच मूळ कारण होय.
       म्हणूनच सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंनी "द्रव्य यंत्र सेवेतव जाए" (आचार - वचन क्र.159 ) असे निरोपण केले आहे. द्रव्य म्हणजे धन व यंत्र म्हणजे स्त्री विषय. याची सेवना केल्याने साधक धर्मापासून जातो. म्हणजे त्याचे पतन होते असे सांगितले आहे. स्त्री विखो यापेक्षाही द्रव्य म्हणजे... 

सदोष (भ्रष्ट) धना द्रव्यामुळे 
तो तात्काळ धर्मापासून जातो....

 कारण द्रव्यामुळे त्याचे ठायी अहंवृत्ती उत्पन्न होते. सत्व जाते. ईश्वराची आवडी राहत नाही, मग बोध जातो. नैमित्तिक दास्य करण्यासाठी सत्व, ईश्वर स्मरण, वेध, बोध,हे गुण अहंतेमुळे निघून जातात. हे गुण निघून गेल्यावर मग तेथे धर्माचे आचरण राहत नाही.* म्हणजे तो धर्मापासून गेलाची. द्रव्याची सेवा घडल्यावर हे तात्काळ घडते. असे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे सांगणे आहे..

      आज काल धर्मकार्यात द्रव्य खर्च करणे फार मोठी जबाबदारीची सेवा मानली जाते. परंतु सेवेसाठी सदोष द्रव्य (धन) खर्च केल्यामुळे साधकाचा धर्मभंग होऊन धर्मापासून जाण्याचे निमित्त कारण होण्याचा दोष पदरी पडतो..

      ज्या साधकांला ईश्वर मिळावा हा निश्चय निरंतर होता तो सदोष द्रव्यांच्या सेवनेमुळे द्रव्याचा अर्थात धनाचाच योगक्षेम करण्याचे बंधन लागले. त्यामुळे साधक धर्मापासून जातो.

      आजच्या परिस्थितीत धर्मप्रचार व धर्मकार्यात सदोष द्रव्याचा - धनाचा खर्च होताना दिसतो. ते अधपतन आसल्याचे ब्रह्मविद्या शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे...

      सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी आचार प्रकरणातील १५९ या वचनात हे स्पष्ट पणे निरोपण केले आहे. पूर्वज ज्ञानीयांनी या सूत्रवचनावर परखडपणे भाष्य केले आहे.

      सदोष द्रव्याचे १७ प्रकार सांगितले आहेत. हे १७ प्रकारचे द्रव्य सेवन केले अथवा कार्यात खर्च केले तर त्यामुळे धर्मापासून जातो असे सांगितले आहे....

सदोष द्रव्याचे १७ प्रकार..

१) एकू चोरी करूनी मेळवी
२) एकू विश्वासघात करूनी मिळवी
३) एकु पडले द्रव्य घे
४)एकु शास्त्राचे कथन करूनी मिळवी
५)एकु क्रय विक्रय करूनी मिळवी
६)एकु निमित्तक प्रधान करूनी आपजवी :- परी ते खर्चू नेदी
७) एकासी धर्मेची द्रव्य मिळे :- परि कार्पण्य दोषे तयाचा वेचू न करी :
८)एकु जोतिष, वैद्यके,चमत्कार दाऊनी मेळवी
९) एकु द्रव्याचा कारणे नवशीए जाप्य केलेया जे प्राप्त झाले
१०) एकु धातुर्वादी
११) एकु अंजनवादे
१२) एकु द्रव्य घेऊनी सदोषासी सरते करती
१३) एकु प्रसादाचा पसारा करूनी मेळवी
१४) एकु असक्त सरले त्याचे द्रव्य हाती लागले
१५) एकास धर्म कर्तव्यासाठी जे धन मिळाले त्याचे उचित काळी खर्च करून ही जे उरले त्याचाही उचित काळी खर्च न करता ते द्रव्य स्वतासाठी ठेऊन घेतो
१६) अथवा स्वताच्या सुख दुखासाठी स्वताजवळ धन ठेवतो
१७) एकु वडील साधक सरलेया त्यांचे द्रव्य हाती लागे परी वेचू न सके..

   हे १७ प्रकारचे द्रव्य सेवन केलेया भिक्षु वासनिक धर्माची हानी होऊन धर्मापासून जातो. असे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात...
      आजच्या काळात वरील सदोष द्रव्य धन जिथे धार्मिक कार्यात खर्च होत असेल तिथे आहार भोजन घेणे दोषास्पद आहे* व अशा सदोष धनातून कार्य करणे हे अहंवृत्ती वाढून स्वताचा व शेकडो साधकाच्या धर्महानीला निमित्त होऊन दोष जोडून घेणे होय. या दोषापासून साधकाने स्वताला वाचवावे....
        संदर्भ :- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरोपित ब्रह्मविद्या शास्त्र, आचार प्रकरण, वचन क्र.१५९
.               महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव
             संकल्प कर्ता, १०८ कोटी नामस्मरण मंदीर,
                 श्रीक्षेत्र खणेपुरी, मो.९८५०४४८५०१

0 Response to "महानुभाव पंथात अंधश्रद्धा / बुवाबाजीला थारा नाही..- महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article