-->
कृतज्ञता सोहळ्यातून रमेश मस्के निरोप.

कृतज्ञता सोहळ्यातून रमेश मस्के निरोप.



नरेंद्र मेश्राम
 "सापताहीक जनता की आवाज" 

भंडारा/अर्जुनी मोरगाव :- 'शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, - तर तो पिढ्या घडवणारा शिल्पकार असतो,' या उक्तीची प्रचिती श्यामाप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, महागाव येथे पुन्हा एकदा आली. विद्यालयातील आदर्श, कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे रमेश आनंदरावजी मस्के दि. ३० मार्च २०२६ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, समर्पित व प्रेरणादायी सेवेला मानवंदना देण्यासाठी विद्यालयात भावपूर्ण' सेवापूर्तीव कृतज्ञता सोहळा' उत्साहात पार - पडला.

रमेश मस्के सरांनी - आपल्या सेवाकाळात केवळ अध्यापनापुरते कार्य मर्यादित - ठेवले नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी - सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी दिलेले ज्ञान, संस्कार, शिस्त, वेळेचे भान आणि प्रामाणिकपणाचे धडे यामुळे ते

विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि पालकवत व्यक्तिमत्त्व ठरले. कार्यक्रमाच्या वेळी विद्यालय परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा कृतज्ञतेचा आणि स्नेहबंधांचा उत्सव ठरला. प्रारंभी मस्के सरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, शिकवण्याची पद्धत आणि विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता

कायम स्मरणात राहील. आपल्या सेवाकाळात मस्के यांनी हजारो विद्यार्थ्यांना घडवले असून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांची निवृत्ती ही केवळ औपचारिक बाब नसून, असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक भावनिक अध्याय ठरली आहे. दरम्यान कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना विद्यालय, सहकारी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे आभार मानले.

श्यामाप्रसाद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या इतिहासात हा सोहळा एक भावपूर्ण व प्रेरणादायी क्षण म्हणून नोंदला जाणार आहे.

0 Response to "कृतज्ञता सोहळ्यातून रमेश मस्के निरोप."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article