-->
कालव्यात वाहुन गेलेल्या युवतीचा मृतदेह सापडला.

कालव्यात वाहुन गेलेल्या युवतीचा मृतदेह सापडला.



नरेंद्र मेश्राम 
"सापताहीक जनता की आवाज" 

भंडारा/अर्जुनी मोरगाव :- मोरगाव (अर्जुनी) येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय युवती पायल वामन शहारे कालव्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३० मार्च रोजी उघडकीस आली होती. दरम्यान त्या युवतीचा मृतदेह २४ तासानंतर इटियाडोह धरणाच्या कालव्यात घटनास्थळापासून आज ३१ मार्च रोजी सकाळी ८. ३० वाजेच्या सुमारास १ किमी. अंतरावर मिळाला.

मोरगाव येथील कु. पायल वामन शहारे ही तरुणी कालव्यावर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुत असताना तिचा पाय घसरल्याने ती थेट कालव्यात पडली. त्या वेळी कालव्यातील २०-२२फुट खोल पाण्याचा प्रवाहात क्षणार्धात वाहून गेली. घटनेची

माहिती मिळताच ईटियाडोह प्रशासनाने तात्काळ कालव्याचा पाणीपुरवठा बंद केल्यानंतर आज सकाळी घटनास्थळापासून १ किमी. अंतरावर तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर मृतदेह अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सुरक्षित पाणघाटावरती पानवटे ची व्यवस्था नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मोरगाव गावात आणि परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

0 Response to "कालव्यात वाहुन गेलेल्या युवतीचा मृतदेह सापडला."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article