सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आज नांदेड दौऱ्यावर..!
शुक्रवार, 24 अप्रैल 2026
Comment
. बाबासाहेब पाटिल
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- दि. २४ एप्रिल :- राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आज दि. २४ एप्रिल वार सुक्रवार रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. आज शुक्रवार २४ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वा. शिरूर ताजबंद येथून आगमन व कंधार तालुक्यातील मोहिजा परंडा येथे इच्छापुर्ती महादेव मंदिर व संत सदाशिव महाराज मंदीर मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ९. ३० वा. मोहिजा परंडा येथून अहमदपूरकडे प्रयाण. दुपारी १. ३० वा. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथून लोहा-नांदेड मार्गे भोकरकडे मोटारीने प्रयाण. दुपारी ३. ३० वा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर विभागाच्यावतीने व समर्थ कॉ. ऑपरेटिव्ह सोसायटी भोकरच्यावतीने सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ- मंजुळानगर भोकर. दुपारी ४ वा. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. नांदेड भोकर शाखा नवीन वास्तुचा लोकर्पण सोहळा समारंभास उपस्थिती. स्थळ-मार्केट कमिटी परिसर भोकर. सायं. ६ वा. भोकर येथून गोरठा ता. उमरीकडे प्रयाण. सायं. ६.२० वा. कैलास गोरठेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ- गोरठा ता. उमरी. सायं. ७वा. गोरठा येथून शिरूर ताजबंदकडे मोटारीने प्रयाण करतील.
0 Response to "सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आज नांदेड दौऱ्यावर..!"
एक टिप्पणी भेजें