-->
नांदेड 'एलसीबी'चे नवे कारभारी बिलोलीचे बहुचर्चित अतुल भोसले..

नांदेड 'एलसीबी'चे नवे कारभारी बिलोलीचे बहुचर्चित अतुल भोसले..

              विजय चौडेकर
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :- जिल्हा पोलीस दलात गुरुवारी रात्री झालेल्या मोठ्या फेरबदलामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) प्रमुखपदी बिलोलीचे बहुचर्चित पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी काल रात्रीच आपला पदभार स्वीकारला आहे. पोलीस अधीक्षकांनी अचानक वापरलेल्या या 'धक्कातंत्रामुळे' जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून एलसीबीच्या नेतृत्वाबाबत विविध चर्चा सुरू होत्या, मात्र अतुल भोसले यांच्या निवडीने आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

0 Response to "नांदेड 'एलसीबी'चे नवे कारभारी बिलोलीचे बहुचर्चित अतुल भोसले.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article