-->
लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी केला करोडोचा गैरव्यवहार--- माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांची चौकशीची मागणी.

लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी केला करोडोचा गैरव्यवहार--- माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांची चौकशीची मागणी.


 मागणीचे निवेदन मुख्य सचिव पशुसंवर्धन विभाग, मुख्यमंत्री, पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी, मुख्य कार्य अधिकारी यांना सादर


         संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी सन 2018- 19 ते 2025- 26 या कालावधीत 81 लाभार्थ्यांना केवळ कागदोपत्री लाभ देऊन अकरा कोटी ,तीन लाख, 40 हजार रुपयाच्या गैरव्यवहार केल्याने त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी सचिव पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार पंकजा मुंडे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री ,जिल्हा अधिकारी भंडारा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, यांना पाठवलेल्या लेखी निवेदनातून केलेली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समितीचे पशुधन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी पुरवठा द्वारा सोबत संगणमत करून सन 2018 ते 19 2025 26 या कालावधीत 118 लाभार्थ्यांपैकी 81 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ न देता कागदोपत्री लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे दाखवून 11 कोटी ,तीन लाख ,40 हजार रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची व लाभार्थ्याची फसवणूक केली आहे. शासनाला फलश्रुती अहवाल कोठे सादर करून शासनाची दिशाभूल केली आहे माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता 118 लाभार्थ्यांना लाभ दिले असून 81 लाभार्थ्यांकडे प्रत्यक्ष जनावरे उपलब्ध नसल्याचे तालुका व पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी पंचायत समिती नाकांदूर यांनी जा क्र/पंसला /तापवदुअ/आस्था 221/2026 दिनांक 30/3/2026 व जा . क्र.222/2026 दिनांक 31/3/2026 या पत्राद्वारे कळविण्यात. आले आहे. तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी पंचायत समिती लाखांदूर यांनी शासनाला पाठविलेल्या फलश्रुती अहवालात दूध उत्पादन व उत्पादनात झालेली वाढ सादर केली असून तो अहवाल पूर्णता खोटा आहे. सन 2018 -19 ह्या वर्षात 13 लाभार्थ्याचे प्रतिदिन 95 लिटर दूध उत्पन्न दाखविले असून 85000 उत्पादनात वाढ झाल्याचे अहवालात नमूद आहे. मात्र सण 2018- 19 या वर्षातील 13 लाभार्थ्यांपैकी एकही लाभार्थ्यांकडे जनावरे उपलब्ध नाहीत, सन 2019 -20 वर्षातील 11 लाभार्थ्यांपैकी 8 लाभार्थ्यांकडे जनावरे नाहीत, सन 2020 -21 वर्षातील 12 लाभार्थ्यांपैकी 8 लाभार्थ्यांकडे जनावरे नाहीत ,सन 2021- 22 वर्षात 17 लाभार्थ्यांपैकी 12 लाभार्थ्यांकडे जनावरे नाहीत, सन 2023 -24 वर्षातील 21 लाभार्थ्यांपैकी 14 लाभार्थ्यांकडे जनावरे नाहीत, सन 2024 -25 वर्षातील 12 लाभार्थ्यांपैकी 9 लाभार्थ्यांकडे जनावरे नाहीत, सन 2025- 26 वर्षातील 32 लाभार्थ्यांपैकी 17 लाभार्थ्यांकडे जनावरे नाहीत, 
सन 2018 19 ते 2024 25 या वर्षात पशुसंवर्धन विभागाने कल श्रुती अहवालात एकूण उत्पादनात 13 लाख 17 हजार 240 एवढे दूध उत्पादन होत असल्याचे शासनास कळविले आहे. मात्र प्रत्यक्ष 188 लाभार्थ्यांपैकी 81 लाभार्थ्याकडे जनावरे उपलब्ध नाहीत. केवळ 37 लाभार्थ्यांकडे जनावरे आहेत मग हा दूध कुठून आले व कोणत्या डेरीत विकण्यात आले याची सुद्धा चौकशी करण्यात यावी. 
लाभार्थ्यांना लाभ देण्यापूर्वी लाभार्थ्यांची आवश्यक कागदपत्राची पडताळणी करावी तसेच लाभार्थ्याने इतर योजनेत लाभ घेतला नसल्याची खात्री करावी त्यानंतरच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा त्यांनी इतर योजनेचा लाभ घेतला असल्यास व त्या लाभार्थ्यास आपण लाभ दिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची राहील अशी लेखी सूचना असून सुद्धा पशुसंवर्धन अधिकारी लाखांदूर यांनी एकाच व्यक्तीला दोनदा तीनदा लाभ दिल्याचे कागदपत्रे दाखवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. 
सदतीस लाभार्थ्यांना दुबार योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे त्यामुळे वरील गंभीर प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व पुरवठादार यांच्यावर कारवाई करावी व सदर योजनेच्या गैरप्रकारात जेवढ्या पैशाचा गैरव्यवहार करण्यात आले आहे ते सर्व संबंधित कर्मचारी व पुरवठादार यांच्याकडून वसूल करण्यात यावी असे मागणी सुद्धा भंडारा जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केलेली आहे.

0 Response to "लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी यांनी केला करोडोचा गैरव्यवहार--- माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांची चौकशीची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article