नात्याला काळिमा;दिराने झोपेत गळा चिरून भावजयीचा घेतला जीव.
मंगलवार, 28 अप्रैल 2026
Comment
• ब्रह्मपुरीच्या महिलेची लाखांदूरात निघृण हत्या; आरोपी फरार.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा/लाखांदूर :- नातेसंबंधाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे रविवारी (दि. २६) पहाटे उघडकीस आली. ब्रह्मपुरी येथील 30 वर्षीय महिलेची तिच्याच दिराने धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत महिला माधुरी तुळसीदास अंबोदे (30) रा. ब्रह्मपुरी आरोपी गौरव अंबादे (25, रा. ब्रह्मपुरी) हा दुचाकीवरून फरार झाला असून,पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
प्रेमसंबंधातून हत्येचा संशय
पाच वर्षापूर्वी माधुरी अंबादे यांच्या पतीचे निधन झाले होते. त्या मुलीसह वास्तव्यास होत्या.
दरम्यान, त्यांचे आरोपी दिरासोबत कथित प्रेमसंबंध जुळल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपीने लग्नासाठी तगादा लावला होता, मात्र माधुरी यांनी त्यास नकार दिल्याचे सांगितले जाते.आरोपीने अन्यत्र विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. माधुरी यांनी त्याचा एक विवाहसंबंध मोल्ण्याही सांगितय वोलले जाते.
या वैयक्तिक वादातूनच घटना घडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
अशी घडली घटना
रविवारी पहाटे सुमारें 3 वाजताच्या दरम्यान पुतणी जान्हवी लघुशंकेसाठी बाहेर गेली.मुलगी बाहेर गेल्याचा फायदा घेत आरोपी गौरवने माधुरी यांचे पाय स्कार्राने बांधले.तोंड उशीने दाबले आणि धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या केली.
आईवर हल्ला होताना पाहून चिमुरली जान्हवीने हंबरडा फोडला.तिच्या रडण्याचा आवाज ऐकून घरमालक जागे झाले. तोपर्यत आरोपी गौरव हा दुचाकीवरून पसार झाला होता.
पोलिसांची कारवाई
घटनेची माहिती स्थानिक पोलिस पाटील यांच्यामार्फत लाखांदूर पोलीसांना देण्यात आली माहिती मिळताच ठाणेदार सचिन पवार, सहाव्यक ठाणेदार आशीष आणि इतर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.लाखांदूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
0 Response to "नात्याला काळिमा;दिराने झोपेत गळा चिरून भावजयीचा घेतला जीव."
एक टिप्पणी भेजें