पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थे तर्फे भव्य सत्कार.
गुरुवार, 2 अप्रैल 2026
Comment
• संविधान ग्रंथ देऊन सन्मान ही खूप कौतुकास्पद गोष्ट - मोनिका ताई हरगुडे.
सोनु संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
सणसवाडी ( पुणे ) :- तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडीचे खजिनदार,आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिक कार्यकर्ते आयु गंगाराम गायकवाड व गौतम गायकवाड यांचे पुतणे आयु प्रफुल्ल गुणवंत गायकवाड यांची तसेच सणसवाडी नगरीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते,रिपब्लिकन ॲक्शन फोर्स पुणे जिल्हा उपाध्यक्ष आयु सोपान राजाराम भालेराव यांची मुलगी त्रिशा सोपान भालेराव व कविता मांदळे यांची नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये महाराष्ट्र पुणे शहर पोलीस या पदावर निवड झाली आहे.अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करत या तिघांनी यश संपादन केले या त्यांच्या यशा बद्दल तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था सणसवाडी पुणे यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या मोनिका ताई हरगुडे,सणसवाडीचे माजी उपसरपंच राजू आण्णा दरेकर,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्ता भाऊ हरगुडे,राष्ट्रीय इंदिरा काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव तात्या यादव, बुद्धिष्ट मूव्हमेंट सेंटर सणसवाडी अध्यक्ष सुनील अण्णा पवार, सीमाई फाउंडेशनच्या अध्यक्षा सीमाताई पवार,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी ताई जाधव,सामाजिक कार्यकर्त्या रिनाताई सोनवणे,बोध्दाचार्य पोपट सोनवणे गुरुजी,मुखईचे माजी ग्रामपंचायत सदस्य सागर भालेराव,सामाजिक कार्यकर्ते किरण सोनवणे,युवराज झेंडे,BSMM ग्रुप शिक्रापूर अध्यक्ष सारंग आल्हाट यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोनिका ताई हरगुडे,राजू आण्णा दरेकर,दत्ता भाऊ हरगुडे, वैभव त्यात्या यादव,सीमाताई पवार,अश्विनी ताई जाधव,रीना ताई सोनवणे,सुनील अण्णा पवार यांच्या हस्ते प्रफुल्ल गायकवाड, त्रिशा भालेराव व कविता मांदळे यांना संविधान ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.आपल्या मनोगतात प्रफुल्ल गायकवाड, त्रिशा भालेराव व कविता मांदळे यांनी आपल्या यशाची यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली आणि यश हे नशिबावर अवलंबून नसून कष्टावर आहे हे उपस्थितांना पटवून दिले.
यावेळी तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी,सणसवाडी,शिक्रापूर नगरीतील समाज बांधव,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थे तर्फे भव्य सत्कार."
एक टिप्पणी भेजें