-->
आजपासून शेतकऱ्यांकरिता डिजिटल शेतीशाळेचे आयोजन.

आजपासून शेतकऱ्यांकरिता डिजिटल शेतीशाळेचे आयोजन.


 नरेंद्र मेश्राम 
"सापताहीक जनता की आवाज" 

भंडारा :- आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक सक्षम व उत्पादनक्षम करण्याच्या उद्देशाने १ एप्रिल २०२६ रोजी विशेष डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांना मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून

शेतीविषयक अद्ययावत माहिती मिळवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या शेतीशाळेत पीक व्यवस्थापन, हवामान अंदाज, कीड व रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन तसे च बाजारभावाची माहिती मोबाईल अॅपच्या साहाय्याने कशी मिळवायची याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कृषी तज्ञ व अधिकारी शेतकऱ्यांच्या

शंकांचे समाधान करून डिजिटल साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, यावर सविस्तर माहिती देतील. सदर उपक्रमामुळे शेतकऱ्यांना वेळेवर योग्य निर्णय घेणे सुलभ होणार असून शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या डिजिटल शेतीशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने केले आहे.

0 Response to "आजपासून शेतकऱ्यांकरिता डिजिटल शेतीशाळेचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article