जि. प. पूर्व प्राथमिक शाळा खापा येथे अनिल लोणकर यांचा उपक्रम.
गुरुवार, 23 अप्रैल 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खापा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थी व युवक संघटनेचे अध्यक्ष व एलआयसी एक्झिक्युटिव्ह अनिल लोणकर यांचे हस्ते शालेय साहित्य चे वाटप करण्यात आले डॉ बाबासाहेब यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काका भाऊ भोयर पत्रकार हे होते तर प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार नाना ठवकर मुख्याध्यापिका विना मिसाळकर शिक्षिका सुनीता राणे , पंकजा गिरीपुंजे सुरेखा ठवकर वनिता चौधरी चंदू वानखेडे उमेद गडपायले होते. याप्रसंगी अनिल लोणकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करावा दुरुपयोग करू नये मोबाईलवर गेम खेळू नये असे प्रकारचे आपले विचार व्यक्त केले दरवर्षी असा उपक्रम राबवित असतात याप्रसंगी विद्यार्थिनी परि हलमारे स्वप्नाली काळे रिमा झंझाड करुणा पंचबुद्धे यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी संचालन शाळेचे शिक्षक संजय राठोड यांनी केले तर आभार गिरीपुंजे मॅडम यांनी व्यक्त केले.
0 Response to "जि. प. पूर्व प्राथमिक शाळा खापा येथे अनिल लोणकर यांचा उपक्रम."
एक टिप्पणी भेजें