बुद्धिस्ट बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत साकेत बुद्ध विहार दिघोरी मोठी येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सभेचे करण्यात आले होते आयोजन.
गुरुवार, 23 अप्रैल 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- बुद्धिस्ट बँक आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत दिनांक १९/०४/२०२६ रोज रविवारला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा भंडारा च्या वतीने साकेत बुद्ध विहार दिघोरी मोठी येथे सभेचे आयोजन करण्यात आले.
सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रवीण थुलकर, प्र. मार्गदर्शक इंजि. रुपचंद रामटेके, जिल्हा महासचिव मनोज बनसोड, डॉ. सुनील जीवनतारे माजी सभापती, रोशन जांभुळकर, मदामे सर, उपस्थित होते. सभेला मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते..
सभेमध्ये जवळपास ४० ते ५० उपासकांना बुद्धिस्ट प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच १०
सभासदांनी बँकेचे शेयर्स विकत घेतले आणि संघटनेची गाव शाखा गठीत करण्यात आली यात गाव मुख्य संघटक म्हणून प्रेमानंद गोस्वामी, अध्यक्ष हरिश्चन्द्र भैसारे, उपाध्यक्ष शैलेश साखरे, सचिव मनसुख वाळदे, महासचिव अरविंद जांभुलकर, भावनाताई गेडाम, इंदुताई बारसागडे व इतर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रेमानंद गोस्वामी तर आभार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शेकडो बौद्ध उपासक उपासकांनी सहकार्य केले.
महामानव डॉ
बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापण केलेली दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे मुख्य उदिस्टये व धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब करीत आहेत त्यांचाच संकल्पनेतून डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट क्रेडिट को. ऑप. सोसायटी ची स्थापना झाली. *येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्यासाठी बौद्धांची स्वतंत्र बँक असणे आवश्यक-जिल्हा महासचिव
मनोज बन्सोड यांनी कळवीले.
0 Response to "बुद्धिस्ट बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत साकेत बुद्ध विहार दिघोरी मोठी येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया सभेचे करण्यात आले होते आयोजन."
एक टिप्पणी भेजें