समानतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. – अनिल लोणकर.
गुरुवार, 23 अप्रैल 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- आंबागड येथे भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक सोनबा आहाके री. टा. मंडळ अधिकारी हे होते. तर अध्यक्षस्थानी स्टुडन्ट युथ फेडरेशनचे अध्यक्ष एलआयसी एक्झिक्युटिव्ह अनिल लोणकर हे होते. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक राजेश बोंबार्डे सर पत्रकार दीपक घोडीचोर सुशीला ताई पटले मा. प. स. सदस्य सरपंच गोपीचंद बावनकर उपसपंच राजहंस कटरे संघरक्षित रामटेके जय मोरे सुनील टेंभरे प्रेस चौधरी विनोदजी कटरे गणेश मेश्राम शिवशंकर चौधरी गुड्डू शरणागते धर्मेंद्र इळपाचे नसिर खा पठाण ज्योतीताई भुतांगे कुंदाताई मेश्राम सुखदास रहांगडाले नितीन ठाकरे महेंद्र पटले हे होते. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानतेच्या अधिकार दिला .
संविधान व संविधानाचे महत्त्व सर्वांना समजवून दिले पाहिजे व संविधान घरोघरी पोहोचला पाहिजे विद्यार्थ्यांनी व युवकांनी आपापली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा उपयोग शिक्षणासाठीच करावा दुरुपयोग करू नये असे विचार व्यक्त केले याप्रसंगी संविधानाच्या ग्रंथ व संविधानाच्या उद्देशिका भेट करण्यात आल्या मार्गदर्शनानंतर डॉ. रामपाल धारकर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यासोबत भोजनदानाच्या कार्यक्रमाही आयोजित केला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्निल श्यामकुवर विनोद भुतांगे शुभम घडले प्रवीण भुतांगे अरविंद भुतांगे मयूर भिवगडे अक्षय भुतांगे यांनी परिश्रम केले.
कार्यक्रमाचे संचालन पंकज भुतांगे यांनी तर आभार स्वप्निल श्यामकुवर यांनी व्यक्त केले.
0 Response to "समानतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. – अनिल लोणकर."
एक टिप्पणी भेजें