-->
सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक 'डेंटल चेअर' कार्यान्वित.

सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक 'डेंटल चेअर' कार्यान्वित.



दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर :- येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा
रुग्णालयातील दंत विभागाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने आज एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले. रुग्णांना अधिक प्रगत आरोग्य सेवा मिळाव्यात या उद्देशाने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अत्याधुनिक नवीन डेंटलचेअरचे (दंतखुर्ची) उ‌द्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या नवीन सुविधेमुळे आता ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांनादंत उपचारांसाठी मोठ्याशहरांकडे धावघेण्याचीगरज

उरणार नाही. या अत्याधुनिक डेंटल चेअरमुळे उपचारांमध्ये अधिक अचूकता आणि सुरक्षितता येणार असून, शस्त्रक्रिया व इतर क्लिष्ट उपचार करणे डॉक्टरांना अधिक सोयीचे होणार आहे. सदर उदघाटन सोहळ्याला डॉ. सचिन बाळबुधे, डॉ. ज्योत्स्ना शिंदे (दंत शल्य चिकित्सक), डॉ. कोरडे, रंजना नंदनवार (सहाय्यक अधिसेविका) यांचा समावेश होता. दंत शल्य चिकित्सक डॉ. ज्योत्स्ना शिंदे यांनी या नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णांचा वेळ वाचणार असून उपचारांचा दर्जा लक्षणीयरीत्या सुधारणार असल्याचे नमूद केले. उपजिल्हा रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने दंत रुग्ण उपचारासाठी येतात. जुन्या साधनसामग्रीच्या मर्यादांमुळे अनेकदा रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, या नवीन सुसज्ज यंत्रणेमुळे उपचारांची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढणार असल्याने सर्वसामान्यांकडून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

0 Response to "सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक 'डेंटल चेअर' कार्यान्वित."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article