-->
गरजू अतिक्रमण धारकांसाठी शासनाच्या दिलासादायक निर्णय : डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज केल्यास मिळणार घराचे पट्टे.

गरजू अतिक्रमण धारकांसाठी शासनाच्या दिलासादायक निर्णय : डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज केल्यास मिळणार घराचे पट्टे.



• तहसीलदार उपेश अंबादे यांचे नागरिकांना आवाहन.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी 

तुमसर :- अनेक वर्षांपासून शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या गरीब, गरजू व सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या 25 मार्च 2026 च्या शासन निर्णयानुसार, दिनांक 1 जानेवारी 2011 रोजी किंवा त्यापूर्वी अस्तित्वात असलेली केवळ निवासी स्वरूपाची अतिक्रमणे नियमित करून पात्र नागरिकांना घराचे पट्टे 500 चौ. फूटापर्यन्त मोफत देण्यात येणार आहेत.

तहसीलदार श्री. उपेश अंबादे यांनी सांगितले की, अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे एका ठिकाणी वास्तव्यास असूनही त्यांच्या घरांना कायदेशीर मान्यता नव्हती. शासनाच्या या निर्णयामुळे अशा कुटुंबांना आता हक्काचे निवास प्रमाणपत्र व पट्टे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणते पुरावे आवश्यक?

अतिक्रमण 1 जानेवारी 2011 पूर्वीचे असल्याचे सिद्ध करण्यासाठी खालील कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत :
 • मतदार यादीतील नाव
 • वीज बिल
 • मालमत्ता कर पावती
 • ग्रामपंचायतीतील ८-अ उतारा
 • अतिक्रमण नोंदवही
 • अधिसूचना
 • इतर शासकीय निवासी पुरावे

तसेच संबंधित व्यक्ती सध्या त्या ठिकाणी वास्तव्यास असल्याचा पुरावा म्हणून मागील एका वर्षातील कोणताही शासकीय निवासी पुरावा सादर करणे आवश्यक राहणार आहे.

अर्ज कुठे करायचा?

 • ग्रामीण भागातील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती तुमसर येथे अर्ज सादर करावा.
 • नगरपरिषद हद्दीतील नागरिकांनी नगरपरिषद तुमसर येथे अर्ज दाखल करावा.

अंतिम मुदत : 31 डिसेंबर 2026

पात्र अतिक्रमणधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह 31 डिसेंबर 2026 पूर्वी अर्ज सादर करावा. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना स्वतःच्या घराचा कायदेशीर हक्क मिळणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तहसीलदार श्री. उपेश अंबादे यांनी नागरिकांना आवाहन केले की, आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावेत आणि शासनाच्या या लोकोपयोगी निर्णयाचा लाभ घ्यावा.”

0 Response to "गरजू अतिक्रमण धारकांसाठी शासनाच्या दिलासादायक निर्णय : डिसेंबर 2026 पर्यंत अर्ज केल्यास मिळणार घराचे पट्टे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article