-->
शारदा विद्यालय, तुमसरचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यशनिकाल:- ९२.७५

शारदा विद्यालय, तुमसरचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यशनिकाल:- ९२.७५



• विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशाने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा.

हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"

तुमसर :- शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तेची परंपरा जपत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या शारदा विद्यालय ने यंदाच्या S.S.C. बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल तब्बल ९२.७५ टक्के लागला असून, विद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंदा विद्यालयातून एकूण १३८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश प्राप्त केले आहे. विशेष म्हणजे, २२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, ४१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ३९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी, तर २६ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.

विद्यालयातून कु. सर्वरी बिसने हिने ९१.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. प्रतिज्ञा बांते हिने ९०.४० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. वैष्णवी चौधरी हिने ८९.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन, सराव आणि मानसिक बळ देत उत्कृष्ट निकालासाठी परिश्रम घेतले. यामध्ये ज्योती बावणकर, दिपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावणकर, अशोक खंगार, नितुवर्षा मुकुरने, प्रिती भोयर, विद्या मस्के, अंकलेश तिजारे, बेनिता रंगारी, सूकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, नेहा बारई, नारायण मोहनकर, दिपक बालपांडे आणि झंकेश्वरी सोनवणे आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्राचार्य राहुल डोंगरे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर मोठी भरारी घेता येते, हे विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.”

विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबीरप्रसाद अग्रवाल, सचिव-रामकुमार अग्रवाल ,पालक, माजी विद्यार्थी आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Response to "शारदा विद्यालय, तुमसरचा एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत दैदिप्यमान यशनिकाल:- ९२.७५"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article