• सात राऊंड फायरिंगमध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, परिसरात दहशतीचं वातावरण.
शुक्रवार, 22 मई 2026
Comment
•कैलाश कॉलनीत भररस्त्यात गोळीबार; उल्हासनगर पुन्हा हादरलं.
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर :- कॅम्प 5 मधील कैलाश कॉलनी चौक गुरुवारी रात्री अचानक झालेल्या थरारक गोळीबाराने पुन्हा एकदा हादरलं. भररस्त्यात झालेल्या या firing मुळे काही काळ परिसरात अक्षरशः दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा असून हल्लेखोरांनी थेट target करून तब्बल सात राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.
या भीषण घटनेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार होताच परिसरातील नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी दुकानं बंद करत गल्लीबोळात धाव घेतली. “अचानक जोराचे आवाज आले, सुरुवातीला फटाके वाटले; मात्र लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसताच भीतीचं वातावरण निर्माण झालं,” अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटनेनंतर काही मिनिटांतच Hill Line पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर बंदोबस्तात घेतला. कैलाश कॉलनी चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून CCTV फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे. आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळत असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.
दरम्यान, उल्हासनगरमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. भररस्त्यात अशा प्रकारे firing होणं ही गंभीर बाब असल्याचं मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. “रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणंही आता धोकादायक झालं आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या घटनेमुळे कैलाश कॉलनी परिसर उशिरापर्यंत तणावाखाली होता. पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात येत असून जुन्या वादातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
0 Response to "• सात राऊंड फायरिंगमध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, परिसरात दहशतीचं वातावरण."
एक टिप्पणी भेजें