-->
सुखाच्या साधनाने परमेश्वर प्राप्ती नाही - महंत लोणारकर बाबा महानुभाव.

सुखाच्या साधनाने परमेश्वर प्राप्ती नाही - महंत लोणारकर बाबा महानुभाव.


"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.

भंडारा/तुमसर :- भौतिक सुखाच्या वैभवाने साधनाने परमेश्वर प्राप्ती तुम्हाला होणार नाही या सुखाच साधन केलं तर तुम्ही तुमच्या साध्याला विसरून जाल परमेश्वर प्राप्तीसाठी तर कठोर परिश्रम घेण्याची मानसिकता साधकांमध्ये पाहिजे कारण युद्धातला विजय हा पलंगावर बसून मिळत नाही व परमेश्वरी सुखही सुखाच्या साधनांमध्ये भेटत नाही परमेश्वर साधकाने हिवाळ्यातील थंडी, उन्हाळ्यातील ऊन व पावसाळ्यातील पाणी या निसर्ग नियमाला तोंड देत आपलंसं करून संयम ढळू न देता जीवन कंठावं ऋतुचक्र बदलत राहतं म्हणून साधकाने संयम ढळू देऊ नये असे प्रतिपादन अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष महंत लोणाकर बाबा यांनी केले.

गोपाल आश्रम (बुलढाणा ) येथे आम्नाय आचार्य
श्रीलोणारकर कुळांतर्गत आचार्य श्रीआलेगावकर पिढी प्रसाद बांधणी अभिषेक सोहळा , पंच अवतार उपहार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते महंत श्री लोणारकर बाबा यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले की रक्ताच्या नात्यापेक्षा परमेश्वराचे नाते श्रेष्ठ आहे जीवन जगत असताना आधी धर्म नंतर कर्म या सूत्राचा अवलंब केला पाहिजे मान अपमान बाजूला ठेवून धर्मकार्यासाठी एकत्र

आले पाहिजे आदर्श उपदेशी, वासनिक, संन्यासी, भिक्षुक कसा असावा याविषयी बाबांनी मार्गदर्शन केले महंत पाथ्रीकर बाबा महंत सोनाळकर बाबा आदी संत महंत यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ किरण वाघमारे (अकोला) यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक महंत आलेगावकर उपाख्य धनंजयदादा लोणारकर यांनी केले.

0 Response to "सुखाच्या साधनाने परमेश्वर प्राप्ती नाही - महंत लोणारकर बाबा महानुभाव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article