गुंजेवाहीतील वाघाच्या थरारक हल्ल्यात मृत पावलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना निवेदिता सोसायटीचा आधार..
शनिवार, 23 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
सिंदेवाही :- तालुक्यातील गुंजेवाही येथे शुक्रवारला झालेल्या वाघाच्या थरारक हल्ल्यात तेंदुपत्ता गोळा करायला गेलेल्या सुनिता कौशिक मोहुर्ले (35), संगीता संतोष चौधरी (40), अनिता दादाजी मोहुर्ले (45), कविता दादाची मोहुर्ले (48) यांचा मृत्यू झाला. ही बातमी संस्थेला कळताच निवेदिता पतसंस्थेच्या परिवाराने आर्थिक व्यवहारासोबतच सामाजिक बांधिलकी जपत सांत्वनपर मृत महिलांच्या कुटुंबीयांना भेट दिली.. तसेच काही दिवसा अगोदर वाघाच्या हल्ल्यामध्येच वच्छला ईश्वर वाडगुरे (63) अरुणा अरुण राऊत (45) या मृत पावलेल्या महिलांच्या सुद्धा कुटुंबीयांना भेट देण्यात आली व सर्वांना संस्थतर्फे आर्थिक मदत प्रदान केली.
0 Response to "गुंजेवाहीतील वाघाच्या थरारक हल्ल्यात मृत पावलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना निवेदिता सोसायटीचा आधार.."
एक टिप्पणी भेजें