लाखनीत कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसावर हल्ला.
शनिवार, 16 मई 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
लाखनी :- कर्तव्य बजावीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला दोन भावाविरुद्ध गुन्हा दाखल
मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना लाखनी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्यांचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. १३ मे रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक गस्त घालत होते. आयशा मशीद रोडवर संशयास्पद फिरणाऱ्या मोटारसायकलला थांबवून पोलिसांनी कागदपत्रांची विचारणा केली. याचा राग येऊन आरोपी भीमराज नेमीचंद मेश्राम याने पोलीस शिपाई भूपेश हटवार यांना शिवीगाळ करून मारहाण केली. आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवरील नेमप्लेट आणि पट्टी तोडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. स्वतःला जखमी करून पोलिसांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. दुसरा आरोपी धम्मराज मेश्रामनेही पोलिसांना धमकावून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम १०९ (१), १२१(१), १३२ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे पोलीसदलात संताप व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत,
0 Response to "लाखनीत कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसावर हल्ला."
एक टिप्पणी भेजें