हजार, ८९१ मजुरांच्या हाताला मिळाले कामः लाखनी तालुका रोजगारात अव्वल.
शनिवार, 16 मई 2026
Comment
• लाखनीत मग्रारोहयो अकुशल कामांना सुरुवात.
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मग्रारोहयो) ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावरील कामांना सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत तालुक्यात १७७ अकुशल कामे सुरू असून, त्यावर १३ हजार ८९१ मजूर कार्यरत आहेत. गटविकास अधिकारी संदीप पानतवने यांच्या प्रभावी नियोजनामुळे मजुरांना हा हक्काचा रोजगार उपलब्ध झाला असल्याची माहिती पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल गि-हेपुंजे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील व गरीब कुटुंबांना वर्षातून किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यात ६० टक्के अकुशल आणि ४० टक्के कुशल कामांचे नियोजन असते. लाखनी तालुक्यात १ नगर पंचायत आणि ७१ ग्रामपंचायतींमध्ये १०४ गावांचा समावेश असून, एकूण लोकसंख्या १ लाख २८ हजार ५४५ इतकी आहे. एकूण ४९ हजार ५३१ नोंदणीकृत मजूर असून खरीप हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत.
लाखनी अब्बल, मोहाडी पिछाडीवर जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या तुलनेत लाखनी तालुक्याने सर्वाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
लाखनी :- १३,८९१ मजूर
साकोली :- १२,८९० मजूर
पवनी :- ९,२२७ मजूर
भंडारा :- ६,४२० मजूर
तुमसर :- ५,९०४ मजूर
लाखांदूर :- ३,२७९ मजूर
मोहाडी :- ३,११५ मजूर
सध्या तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींनी प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे. यामध्ये परसोडी, डोंगरगाव/साक्षर, सोनमाळा, मोरगाव, आलेसुर इत्यादी गावात नाला सरळीकरणाची
प्रशासकीय यंत्रणा मजुरांच्या दारी वाढता उन्हाळा लक्षात घेता सध्या सर्व कामे सकाळच्या सत्रात राबविली जात आहेत. ही कामे यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी संदीप पानतवने यांच्या मार्गदर्शनात विस्तार अधिकारी खिलेंद्र टेंभरे, निखिल गजभिये, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल गि-हेपुंजे, तांत्रिक सहाय्यक महेश बर्वे, यशवंत शेंडे, अविनाश वालोदे, गिरिधर मेश्राम, आनंद वाघाये, अमरदीप शेंडे, राकेश दाते, सुधाकर कांबळे, कुंदन लिमजे, किरण बावनकुळे, रजनी नांदगावे परिश्रम घेत आहेत. संगणक परिचालक हितेश झलके, रामेंद्र लाडे, गणेश टीचकुले, अस्मिता कावळे यांच्यासह रोजगार सेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत कमिटी सहकार्य करत आहेत.
कामे सुरू आहेत. तर मांगली, किटाडी, दिघोरी, कन्हाळगाव, गराडा, सोनेखारी, पिंपळगाव, सामेवाडा, लाखोरी, मोगरा, मिरेगाव इत्यादी गावांत मामा तलावातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच खुनारी, पळसगाव, निमगाव, जेवनाळा, सावरी, चान्ना, धानला, निलागोंदी, धाबेटेकडी, शिवणी या गावात बंधाऱ्यातून गाळ उपसण्याचे काम सुरू आहे.
याव्यतिरिक्त रामपुरी, सिपेवाडा येथे पाट दुरुस्ती, गुरढा व केसलवाडा (पवार) येथे वृक्ष लागवड आणि सर्वच ग्रामपंचायतींमध्ये ९४ घरकुलांची कामे अशी एकूण १७७ कामे प्रगतीपथावर आहेत.
0 Response to "हजार, ८९१ मजुरांच्या हाताला मिळाले कामः लाखनी तालुका रोजगारात अव्वल."
एक टिप्पणी भेजें