स्पर्धा परीक्षेत टिकायचे असेल तर सातत्य आवश्यक.
रविवार, 10 मई 2026
Comment
. परिक्षेत पात्र ठरलेले विधार्थी प्राचार्य व शिक्षक वृंद
• प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे : शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तिरोडा :- विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य प्रोत्साहन मिळाले तर त्यांच्यात यशाची नवी उमेद निर्माण होते. आजचे युग हे एआय, संगणक आणि स्पर्धेचे युग असून शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावणे आवश्यक आहे. आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये लाखो विद्यार्थी सहभागी होत असले तरी सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या जोरावरच यश संपादन करता येते, असे प्रतिपादन वडेगाव येथील भीवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे यांनी केले.
भीवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून बोलत होते. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यालयातील इयत्ता आठवीच्या दहा विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत चार वर्षे दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती लाभ मिळणार आहे.
कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता भोयर, आरोग्य सेविका मेघा शंभरकर तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. संगीता भोयर यांनी विद्यार्थी,
शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी
लक्ष दसाराम गौतम, समीक्षा सुरेश बोपचे, नेहा अविनाश हटवार, सोनल खेमराज ठाकरे, स्वर्णा अशोक बावणे, खुशी संतोष कोसरे, सिद्धी होमचंद बिसेन, आर्या सुखदेव कटरे, अथर्व महेंद्र मेश्राम आणि मुस्कान किशोर पटले.
शिक्षक आणि विद्यालय प्रशासनाचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे परिश्रम आणि मुख्याध्यापकांचे योग्य नियोजन यामुळेच शाळेची प्रगती होत असल्याचे सांगितले. पुढील वर्षीही अधिकाधिक विद्यार्थी यशस्वी व्हावेत, असे आवाहन त्यांनी केले. संचालन विवेककुमार बन्सोड यांनी केले. आभार आर.एस. मेश्राम यांनी मानले.
0 Response to "स्पर्धा परीक्षेत टिकायचे असेल तर सातत्य आवश्यक."
एक टिप्पणी भेजें