-->
महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे ऋतू ठाकरेचा सत्कार.

महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे ऋतू ठाकरेचा सत्कार.

  

 • दहावीत ९४.८० टक्के गुण; तालुक्यात द्वितीय क्रमांक.

"साप्ताहिक जनता की आवाज"
         वृत्तपत्र प्रतिनिधी 

तिरोडा :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वडेगाव येथील विद्यार्थिनी कुमारी ऋतू रूपराज ठाकरे हिने ६४.८० टक्के गुण मिळवून शाळा व केंद्रातून प्रथम, तर तिरोडा तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघ, शाखा तिरोडातर्फे तिचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभात महाराष्ट्र पत्रकार संघाचे मार्गदर्शक तथा जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य डी. आर. गिरीपुंजे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन ऋतूचा गौरवकरण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण होते. यावेळी संघाचे तालुकाध्यक्ष अजय नंदागवळी, पत्रकार देवानंद शहारे, सुबोध बैस व डी. एस. बोदेले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ऋतूचे आई-वडील, आजोबा व भाऊही उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना ऋतू ठाकरे हिने, "डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे माझे स्वप्न आहे," असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सुबोध बैस यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवानंद शहारे यांनी मानले.

0 Response to "महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे ऋतू ठाकरेचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article