-->
विधानपरिषद उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून.

विधानपरिषद उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क 

भंडारा :- भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून नामनिर्देशन पत्र सादर करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना आपले अर्ज जिल्हाधिकारी तथा भंडारा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून असून, २ जून रोजी अर्जाची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत ४ जून आहे. १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

0 Response to "विधानपरिषद उमेदवारी अर्ज प्रक्रिया आजपासून."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article