-->
 सप्तव्येशनी आहारी असलेल्या व्याक्ति च्या संकटात ईश्वर धावत नाही...

सप्तव्येशनी आहारी असलेल्या व्याक्ति च्या संकटात ईश्वर धावत नाही...


 हे अर्जुना,
माझा भक्त कधीही नष्ट होत नाही,
असे श्रीकृष्ण भगवंत गीतेत म्हणतात 
मग युधिष्ठिर द्युतक्रिडा का हरले ?

    भगवान श्रीकृष्ण गीतेत अर्जुनाला सांगतात की..
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति | - जो कोणी पूर्ण भावाने मला शरण येतो आणि माझी भक्ती करतो, त्याचा कधीही नाश होत नाही. (गीता अ. ९ श्लोक ३१ )

मग श्रीकृष्ण भक्त
युधिष्ठिराचा पराजय कसा झाला ?

     युधिष्ठिर हे श्रीकृष्णाचे परम भक्त. त्यांना श्रीकृष्णाचे सान्निध्य लाभले होते. त्यांची एकनिष्ठ ईश्वर भक्ती होती. तरीही श्रीकृष्णाने द्यूतक्रिडेच्या प्रसंगी त्यांना साहाय्य केले नाही.द्रौपदीला साहाय्य केले. परंतु युधिष्ठीराला साहाय्य केले नाही. युद्धीष्ठीर द्यूतक्रिडेत राज्य हरले,राजमुकूट हरले. स्वताचे भाऊ हरले. द्रौपदीही हरले. नंतर १२ वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञात वासही स्वीकारावा लागला.श्रीकृष्णाचे भक्त असूनही युधिष्ठिराचा पराजय झाला. 
      यावरून श्रीकृष्णाने गीतेत दिलेले नमे भक्त प्रणश्यती हे वचन खोटे झाले असेच म्हणावे काय ? - जो कोणी पूर्ण भावाने मला शरण येतो आणि माझी भक्ती करतो त्याचा कधी ही नाश होत नाही. असे भगवंत म्हणतात ते असत्य आहे काय ? 
      भक्ताचा नाश ( पराजय ) होत नाही. तर मग द्यूतक्रिडेत युधिष्ठिराचा नाश (पराजय) कसा झाला ? द्रौपदी व स्वत:चे बंधू डावावर लावून हा डाव ते का हरले ? श्रीकृष्णाचे भक्त असूनही पांडव द्यूत क्रिडेत हरले. यावरून भगवान श्रीकृष्णाने नमे भक्त प्रणश्यति हे गीतेत दिलेले वचन खोटे ठरले असेच म्हणावे लागेल.. ? परंतु परमेश्वराचे वचन कधीही खोटे होत नाही.. मग का हरले..?
      श्रीकृष्णाचे भक्त युधिष्ठिर यांना द्यूतक्रिडेचे व्यसन होते. ज्यांना द्यूत क्रिडेचे व्यसन असते त्यांनी केलेली ईश्वरभक्ती व्यर्थ जाते. त्यांच्या ईश्वर भक्तीचा, नामस्मरणाचा व ज्ञानाचा परमेश्वर अभिमान घेत नाहीत. म्हणूनच द्यूतक्रिडेत श्रीकृष्णाने युधिष्ठिराला साहाय्य केले नाही. 

युधिष्ठिराने द्यूत क्रिडेचे 
निमंत्रण स्वीकारले....
-------------------
     द्रव्याच्या आसक्तीतून द्यूत क्रिडेचा उदय होतो. द्रव्याची आसक्ती म्हणजेच लोभ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात काम क्रोध स्तथा लोभ तस्मादेतत्त्रयं त्यज्येत | त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाश नमात्मन :|| काम क्रोध व लोभ हे तीनही नरकाचे द्वार आहेत. या तिघांमुळे मनुष्याचा नाश व पराजय होतो. म्हणून मनुष्याने काम क्रोध व लोभ यांचा त्याग करावा. 

काम, क्रोध व लोभ यामधून 
सात व्यसने उत्पन्न झाली आहेत...

     १) द्यूत, २) * मद्य, ३) मांस, ४) हिंसा, ५) चोरी, ६) परस्त्री अभिलाषा (व्यभिचार) व ७) वेश्यागमन... या सप्त व्यसनांपैकी मनुष्याला यातील एखादे जरी व्यसन असले तरी मनुष्याचा नाश होतो. त्याला ईश्वराचे साहाय्य लाभत नाही... हेच कौरव पांडवाच्या द्यूतक्रिडेच्या प्रसंगा वरून आपल्याला दिसते...

सप्त व्यसनापैकी एखादे जरी व्यसन
 भिक्षू - वासनिकाला जडले 
तरी त्यांनी केलेली ईश्वरभक्ती व्यर्थ जातो
     म्हणूनच महानुभाव पंथामध्ये उपदेश देण्याआधी या सप्त व्यसनांचा त्याग करण्याची शपथ दिली जाते. ही शपथ जो घेईल त्यालाच ५ नामे सांगून महानुभाव पंथात उपदेश देऊन प्रवेश दिला जातो... आणि जर एखादे व्यसन तुम्हाला जडले तर ... 
तुम्ही परमेश्वराचे कितीही नामस्मरण करा.
तुम्ही कितीही दान करा.
तुम्ही कितीही तीर्थस्थान वंदन करा.
तुम्ही कितीही प्रसाद वंदन करा.
तुम्ही ईश्वराचे कितीही ज्ञानी असा,
तुम्ही महानुभाव पंथाशी कितीही निष्ठावंत असा
तुम्ही कितीही तत्वनिष्ठ असा
किती ही सेवा करणारे असा, 
तुम्ही कितीही देवाचे निकटवर्तीय असा
-- वरील सात व्यसनापैकी तुम्हाला एक जरी व्यसन जडले तरी तुमचा नाश व पराजय झालाच म्हणून समजा... व्यसनात गुरफटणार्या भक्ताचा परमेश्वर अभिमान घेत नाहीत व संकटात साहाय्यही करीत नाहीत.. 
द्युतक्रिडा या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळेच युधिष्ठिराला श्रीकृष्णाने साहाय्य केले नाही... त्यांचा पराजय झाला... द्यूतक्रिडा या व्यसनाच्या मागे द्रव्य लोभ जबाबदार आहे..
 
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी
म्हणतात द्रव्य - यंत्र सेवेमुळे धर्म नष्ट होतो

सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंनी "द्रव्य यंत्र सेवेतव जाए" (आचार - वचन क्र.159 ) असे निरोपण केले आहे. द्रव्य म्हणजे धन व यंत्र म्हणजे स्त्री विषय. याची सेवना केल्याने साधक धर्मापासून जातो. म्हणजे त्याचे पतन होते असे सांगितले आहे. स्त्री विखो यापेक्षाही द्रव्य म्हणजे सदोष धना द्रव्यामुळे तो तात्काळ धर्मापासून जातो. कारण द्रव्यामुळे त्याचे ठायी अहंवृत्ती उत्पन्न होते. सत्व जाते. ईश्वराची आवडी राहत नाही, मग बोध जातो. नैमित्तिक दास्य करण्यासाठी सत्व, ईश्वर स्मरण, वेध, बोध,हे गुण अहंतेमुळे निघून जातात. हे गुण निघून गेल्यावर मग तेथे धर्माचे आचरण राहत नाही. म्हणजे तो धर्मापासून गेलाची. द्रव्याची सेवा घडल्यावर हे तात्काळ घडते. असे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे सांगणे आहे..

भरकटलेले ज्ञान - भक्ती - वैराग्य 

      आज जो तो द्रव्य संचयाच्या मागे लागला आहे. दुप्पट तिप्पट करून धनात लोळण्याचे स्वप्न जो तो पाहात आहे. व्याज, शेअर्स , जुगार, गुंतवणूक याद्वारे द्रव्य मिळविण्याची स्पर्धा सर्वत्र दिसत आहे... आजचे ज्ञान भक्ती वैराग्य द्रव्य लोभाने बरबटले आहे...
       
जखम पायाला मलम शेंडीला

      आज सप्त व्यसनरूपी साथीचा रोग समाजात पसरत चालला आहे. त्याजवर उपचार न करता वेगळ्याच दिशेने धर्माचा विकास करण्याचे कार्य समाजात चालले आहे... सप्त व्यसनाबद्दल प्रबोधन करण्यात आम्ही कमी पडत चाललो आहे.. आज निरोपणे, प्रवचने, पोथ्या.. पदयात्रा याचे आयोजने तर मोठ्या प्रमाणात होत आहेत.. परंतु यामधून सप्त व्यसनाबद्दल भीक्षू वासनिक मौन बाळगताना दिसतात. यावरून मराठीतील एक म्हण येथे आठवते.. जखम पायाला व मलम शेंडीला.. असे प्रचारकार्याचे आजचे स्वरूप आहे...
       स्वत:धर्मी दक्ष असल्याचा आव मात्र सर्वत्र आणला जातोय. स्वःताला फारच आचरणवंत साबित करण्यासाठी लीळाचरित्रातील विस्तृत लिखान, तात्विक चर्चा केल्या जात आहेत...या सर्व चर्चेचे आपण स्वागच केले पाहिजे... 

समाज सप्त व्यसनी
बनला तर धर्मच उरणार नाही

      खरे पाहिले तर आज समाज सप्त व्यसनाच्या आहारी जाऊन अधोगतीकडे चालला आहे. समाज व्यसनाधीन बनला तर धर्मच उरणार नाही... मग लीळा, प्रवचने, पोथ्या कुणाला सांगणार... आधी समाज द्यूत, मद्य, मांस, हिंसा, चोरी, परस्त्री अभिलाषा, वेश्यागमन या सप्त व्यसनापासून मुक्त करण्यासाठी झटले पाहिजे.. तरच नामस्मरण, लीळा, ब्रह्मविद्या ज्ञान, पोथ्याचे बीज पेरणे शक्य आहे... आज समाजाची जखम एकीकडे आहे व आम्ही मलम दुसरीकडेच लावत आहे. सप्त व्यसनावर जाहीर जनजागृती ही आजची गरज आहे....
.               महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव
       सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी चरणांकित भारद्वाज वेध           तीर्थस्थान, १०८ कोटी नामस्मरण मंदीर, श्रीकृष्णनाथ           महानुभाव मंदीर, श्रीक्षेत्र खणेपुरी, या.जि.जालना..
                           मो. ९८५०४४८५०१

0 Response to " सप्तव्येशनी आहारी असलेल्या व्याक्ति च्या संकटात ईश्वर धावत नाही..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article