-->
"महाराष्ट्र भूषण सन्मान " पुरस्काराने "इलेक्ट्रिक मॅन" अभय डी. रंगारी सन्मानित.

"महाराष्ट्र भूषण सन्मान " पुरस्काराने "इलेक्ट्रिक मॅन" अभय डी. रंगारी सन्मानित.


• आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन पूणे ने घेतली अभय च्या अलौकिक कार्याची दखल.

        हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व, अभय डी. रंगारी यांना महाराष्ट्र राज्यस्तरावरील कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान सोहळया अंतर्गत महाराष्ट्र भूषण सन्मान 2026 ने सन्मानित करण्यात आले ,त्यांच्या समाजकार्यातील अत्यंत उल्लेखनीय योगदानामुळे ही सन्मानाची मान्यता देण्यात आली आहे. त्याच्या कार्याची नोंद आता विदर्भ बुक ऑफ रेकॉर्ड आणि जंबुद्दीप भारत नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे,

कुशल नेतृत्व ,जननायक ,लोकगौरव ,वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी ,जनसामान्यांना असामान्य बुलंद आवाज, विराट व्यक्तिमत्त्वाचे धनी,राजकीय विश्लेषक, लेखक, मुक्त पत्रकार, समाजसेवक, कुशल संघटक , प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना एकत्र करून जनतेच्या न्याय व हक्कासाठी संपूर्ण प्रकृतीत आपल्या नेतृत्वाच्या तेजाने संपूर्ण जनतेला आपलेसे करणारे ,आदमी देखकर आदमी की पहचान करने वाला आदमी अशी जनमानसात ओळख असणारे अभय डी रंगारी हे एक अत्यंत प्रेरणादायक नेतृत्व असल्याने त्यांचे कार्य केवळ पुरस्कारांपुरतेच मर्यादित नाही. त्यांच्या कार्याचे व्यापक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आणि पर्यावरणीय क्षेत्रांवर खोल परिणाम झाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली केल्या गेलेल्या आंदोलने आणि सुधारणा भारतीय समाज आणि प्रशासनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत.
अभय डी. रंगारी यांना "इलेक्ट्रिक मॅन" म्हणून ओळखले जाते, कारण ते ज्या कार्यक्षेत्रात कार्य करतात त्या क्षेत्रात , समाजात ""विद्युत वेगाने"" जागरूकता निर्माण करतात. ते एक कुशल समाजसेवक, लेखक, मुक्त पत्रकार आणि प्रभावी वक्ता आहेत. त्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण अंग म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक, मानवाधिकार विचारधारेवर विश्वास ठेवून,आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकुशलतेवर निष्ठा ठेऊन , छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिनिधित्वाच्या विचारधारेवर विस्वास ठेऊन समाजातील समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा प्रचार करत आहेत.

अभय डी रंगारी यांनी सामाजिक न्याय आणि समानता विषयावर जनजागृती केली आहे मतदानाबाबत जनजागृती, संविधान सन्मान आणि मूलभूत कर्तव्यांची जाणीव हे त्यांच्या कार्याचे मुख्य केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या संघर्षाच्या कथेने देशभरातील लाखो लोकांना प्रेरणा दिली आहे.

त्यांचा संघर्ष आणि चळवळ.

अभय डी रंगारी यांचे कार्य विविध मोर्चे , निवेदने, धरणे प्रदर्शन, आणि आंदोलनांद्वारे ओळखले जाते. त्यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनं झाली, ज्यात त्यांनी शेती, शेतकऱ्यांचे हक्क, आधार कार्ड धोरण, शिक्षणातील काळा बाजार, स्मार्ट मीटरचा विरोध आणि अन्नसुरक्षा व पशुसंवर्धन व जनावरांना चराईसाठी खुले जंगल यावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी रस्ता रोको आंदोलन, जेलभरो आंदोलन आणि भारत बंद आंदोलन यांसारखी महत्त्वाची जनचळवळी राबवली आहेत, ज्यात सामान्य जनतेला एकत्र करून प्रशासनाविरुद्ध आवाज उठवला.

प्रेरणादायी कार्य आणि पुरस्कार.

अभय डी रंगारी यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कार प्राप्त झाले आहेत. काही प्रमुख पुरस्कारांची यादी:

1) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजसेवक पुरस्कार (निवड) – संभाजीनगर


2)  कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार – मुंबई


3) गोल्डन पिकॉक अवॉर्ड – मुंबई


4) मानवाधिकार पुरस्कार – अहिल्यानगर


5) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार – कोल्हापूर


6) जीवनगौरव पुरस्कार – पवनी, भंडारा


7) प्रबोधिनी स्टार पुरस्कार – चंद्रपूर

8) प्रजासत्ताक गौरव -मानवसेवा पुरस्कार (ठाणे)


9) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले समाज भूषण पुरस्कार (नागपूर)

  10) महाराष्ट्र एक्सलंस अवार्ड 2026 (निवड) मलकापूर , बुलढाणा 
 
हे पुरस्कार त्यांच्या विविध कार्याचे मान्यता आहेत आणि समाजाच्या प्रत्येक स्तरावर त्यांच्या कार्याची आणि नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

शेती व पशुसंवर्धन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका
 त्यांचा विश्वास आहे की "शेती वाचली तर शेतकरी वाचेल, शेतकरी वाचला तर देश वाचेल!" हे सत्य आहे. शाश्वत शेती आणि सजीवांचा सन्मान यावर आधारित त्यांच्या विचारधारेतून पर्यावरणाच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक क्रांतिकारी उपाय सुचवले आहेत. त्यांनी चराईसाठी मोकळं जंगल, जल आणि जमीन रक्षण यावर आवाज उठवला आहे.

अभय डी रंगारी यांच्या जीवनावर चित्रपटाची निर्मिती.

अभय रंगारी यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी चित्रपट तयार होणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या संघर्षाची, कार्याची आणि विचारधारांची कथा सांगितली जाईल. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक कठीण क्षणांची छाया होईल, आणि त्यातून हे स्पष्ट होईल की संघर्षातून निर्माण होणारा प्रकाश अनेक लोकांसाठी एक मार्गदर्शक ठरतो

त्यांचे जीवनप्रवास आणि कार्य केवळ त्यांच्या स्वतःच्या पिढीसाठीच नव्हे, तर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी एक प्रेरणा बनणार आहे. त्यांचे संघर्ष आणि कार्य जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात समाजात परिवर्तन घडवण्याची क्षमता आहे.

अभय डी. रंगारी यांचे कार्य अनेक क्षेत्रांमध्ये वाचनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी लोकशाही, मानवाधिकार, पर्यावरण, शेतकरी आणि समाजसेवक म्हणून विविध कार्य केले आहे. त्यांचे नेतृत्व जनतेच्या हितासाठी नेहमीच आहे आणि यामुळे त्यांना पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष आणि विजय भावी पिढ्यांसाठी एक प्रेरणा बनवेल.
कर्तृत्व, समर्पण,आणि महाराष्ट्र राज्यातील गौरवाचा सन्मान म्हणून ज्यांनी समाजाला दिशा दिली आणि आपल्या कार्यातून प्रेरणा निर्माण केली अशा महान व्यक्तीमत्वाचा गौरव म्हणून महाराष्ट्र भूषण सन्मान 2026 
सन्मानपत्र , सन्मानचिन्ह, मेडल, देऊन आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन तर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला
"नेतृत्वासाठी जन्मलेला नाही, पण परिस्थितीने नेता बनवला!" ""एकच मिशन ,व्यवस्था परिवर्तन"" अशी हाक देणाऱ्या इलेक्ट्रिक मॅन च्या बाबतीत ""ध्यान रखना ,जिनके जीवन मे दिखता है अच्छा संस्कार , और उनके कार्य से देश- समाज को मिलता है आकार, संत महापूरषो का सपना होता है साकार , जो हमेशा विषमता के खिलाप देते है ललकार ,ऊनको ही मिलता है पुरस्कार ही बाब सार्थ ठरते , अशा अभय ला पुढील वाटचालीस परिसरातील चाहत्यांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

0 Response to ""महाराष्ट्र भूषण सन्मान " पुरस्काराने "इलेक्ट्रिक मॅन" अभय डी. रंगारी सन्मानित."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article