तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला!
सोमवार, 25 मई 2026
Comment
. मुंडे साहेब पदभार स्वीकारत्या वेळी फोटो
• सरकारने पदावनती केल्याची मुंढेची भावना; दीड महिना ठेवलेले प्रतीक्षेत
• महाराष्ट्रातील धडाडीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी.
मुंबई :- धडाडीचे, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी
म्हणून राज्यात नावलौकीक असलेले तुकाराम मुंढे अखेर आठवडाभराने अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास राजी झाले आहेत. सोमवारी दुपारी ११ वाजता मुंढे यांनी वांद्रे- कुर्ला संकुलातील अन्न व औषध प्रशासनाच्या राज्य मुख्यालयात आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.
मुंढे यांची आठ दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी त्यांची दिव्यांग सक्षमीकरण विभागातून तडकाफडकी उचलबांगडी केल्यानंतर मुंढे यांना गेले दीड महिना मुंढेंना पदाच्या प्रतीक्षेत ठेवले होते. पसंतीच्या अधिकाऱ्यांकडे दोनदोन खाती आणि मुंढे यांना मात्र घरी बसवल्याने समाज माध्यमांमध्ये चर्चा होऊ लागली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागात मुंढे यांचे बळेबळे पुनर्वसन करण्यात आले आहे.
अन्न व प्रशासन आयुक्तपद हे भारतीय प्रशासन सेवेतील नवख्या अधिकाऱ्यांकडे किंवा बढतीने आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांना दिले जाते. मुंढे यांचा अनुभव २० वर्षांचा असताना त्यांची या सामान्य पदावर बोळवण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. अन्न व औषध प्रशासनाचे सचिव धीरज कुमार आहेत. ते मुंढे यांच्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांना मुंढे कसे रिपोर्ट करणार म्हणून या पदाचा कार्यभार पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्याकडे देण्यात आला.
0 Response to "तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला!"
एक टिप्पणी भेजें