-->
AI चे युगात भंडारा पोलीसांचा नाविन्यपुर्ण उपक्रम PROJECT HAWK.

AI चे युगात भंडारा पोलीसांचा नाविन्यपुर्ण उपक्रम PROJECT HAWK.


        हर्षवर्धन देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

  भंडारा :- जिल्हा पोलीस विभागाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी PROJECT HAWK हे नाविन्यपुर्ण उपक्रम सुरू केले आहे. श्री मयंक माधव (IPS), सहायक पोलीस अधिक्षक, उपविभाग तुमसर यांनी श्री नुरूल हसन (IPS), पोलीस अधिक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात भंडारा जिल्हयातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे डिजिटल मॅपिंग करून गुन्हेगारांचा शोध घेणे आणि गुन्हे रोखणे करीता PROJECT HAWK तयार केला असून त्याबाबत श्री नुरूल हसन (IPS), पोलीस अधिक्षक भंडारा यांनी दि १५/०६/२०२६ रोजी गुन्हे आढावा बैठकीत त्यांचा गौरव केला आहे.

PROJECT HAWK चा उद्देश भंडारा जिल्हयातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे डिजिटल मॅपिंग करून गुन्हेगारांचा शोध घेणे आणि गुन्हे रोखणे हा आहे.

PROJECT HAWK ची वैशिष्टये

'प्रोजेक्ट हॉक'चे (Project Hawk) दोन भाग आहेत. भाग एक सीसीटीव्ही मॅपिंग आणि भाग दोन- गुन्हेगार मॅपिंग.

या उपक्रमांतर्गत भंडारा जिल्हयात गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा जलद गतीने शोध घेण्यासाठी जिल्हयातील एकूण २९२३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तसेच भंडारा जिल्हयातील एकूण १९१६ रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे त्यांच्या राहत्या ठिकाणानुसार डिजिटल नकाशावर मॅपिंग करण्यात आले आहे. PROJECT HAWK चे फिल्टर्स वापरून भंडारा जिल्हा पोलिसांना गस्तीदरम्यान अशा गुन्हेगारांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून त्यांची विशिष्ट तपासणी करता येईल. या 'प्रोजेक्ट हॉक' (Project Hawk) चा वापर केल्याने पोलीस विभागाला जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी तसेच गुन्हे रोखण्यासाठी मदत होणार आहे.

0 Response to "AI चे युगात भंडारा पोलीसांचा नाविन्यपुर्ण उपक्रम PROJECT HAWK."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article