-->
तुमसर पोलिसांनी सतर्कतेने चोराला पकडले.

तुमसर पोलिसांनी सतर्कतेने चोराला पकडले.


• भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्ह्याची नोंद.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी
 
तुमसर :- पोलिस प्रेस नोट प्राप्त माहिती नुसार, स्टेशन तुमसर येथे अप. क्र. 283/2026 331(3),305 (अ) भा.न्या.सं. अन्वये दिनांक 27/02/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात फिर्यादी चंद्रशेखर श्रीराम सार्वे वय- 42 वर्षे धंदा- बाधकाम ठेकेदार रा. खडकी, ता. मोहाडी जि. भंडारा ह.मु. श्रीराम नगर तुमसर यांनी तोंडी तक्रार दिली होती की, दिनांक 27/02/2026 रोजी रात्री दुपारी 12.00 वा. ते सायकाळी 05.30 वा. दरम्यान आपल्या घराच्या दाराला कुलुप लावुन आपल्या बांधकाम कामावर गेला असता अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचा दाराचा कुलुप तोडुन आत प्रवेश करुनबेडरुम मधील लाकडी कपाटात पर्स मध्ये ठेवलेले 1) एक 5 ग्रॅम सोन्याचा मंगळसुत्र जुना वापरता किंमती 40,000/रु. व नगदी 30,000/ रु. रोख रक्कम असा एकुण 70,000/ रु. चा मुद्देमाल अज्ञात चोराने सुना मोका पाहुन चोरुन नेला.

सदर गुन्हयाचा तपास 

सदर गुन्हयात आरोपी अज्ञात असल्याने पोलीस स्टेशन तुमसर यांच्याकडून स्वतंत्र तपास पथके तयार करून गोपनीय सूत्रांच्या आधारे तसेच गुप्त माहिती संकलित करण्यात आली. प्राप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने मालविय वार्ड तुमसर येथून आरोपीचा शोध घेऊन आरोपीच्या ताब्यातुन एक सोन्याची चापट गोलाकार लगड वजन 4.780 ग्रॅम किमंती 40,000/ रु.चा मुद्देमाल गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करुन गुन्हा उघडकीस आणण्यात यश मिळविले आहे.

तपासात खालील आरोपी निष्पन्न झाले आहे. 

आरोपी नामे- प्रदिप प्रेमलाल गौरे वय- 47 वर्षे रा. मालविय वार्ड तुमसर ता. तुमसर जि. भंडारा

उल्लेखनीय कामगीरी 

सन 2026 मध्ये पो.स्टे. तुमसर येथे एकुन 05 घरफोडी दाखल आहेत, आणि सर्व चे सर्व एकुन 05 घरफोडी उघड करण्यात तुमसर पोलीस यांना यश मिळाले आहे. या 05 घरफोडीचे एकुन 2,93,200/-रू. चा मुद्देमाल चोरीस गेलेला होता,

सदर उल्लेखनीय कामगिरी मा. नूरुल हसन, पोलीस अधीक्षक, भंडारा, मा. निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, भंडारा, मा. मयंक माधव, सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुभाष बारसे (ठाणेदार), पो.उप.नि. प्रविण सयाम, तसेच पो.हवा. शरद रामटेके पो.शि. बळदे, राजकुमार गिरीपुंजे, नितीन झंझाड, विजय दमाहे, व अजय बावने, यांनी केली असुन पुढील तपास पो.उप.नि. प्रविण सयाम, पोलीस स्टेशन तुमसर हे करीत आहेत,

0 Response to "तुमसर पोलिसांनी सतर्कतेने चोराला पकडले."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article