-->
तलाठी कार्यालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत लोकप्रतिनिधी,शासन निद्रस्थ...

तलाठी कार्यालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत लोकप्रतिनिधी,शासन निद्रस्थ...

 
 

 • तलाठी कार्यालय पहेला येथे नवीन इमारत तयार असूनही कार्यान्वित नाही – नागरिक व ज्येष्ठ नागरिकांना अडचणी 

       कुलदीप गंधे प्रतिनिधी 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

पहेला :- येथील तलाठी कार्यालयासाठी नवीन इमारत बांधून पूर्ण झालेली असूनही ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना जुन्या ठिकाणी किंवा तात्पुरत्या ठिकाणी जाऊन विविध शासकीय कामांसाठी धावपळ करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत किंवा संबंधित कार्यालयांमध्ये कामासाठी गेल्यानंतर त्यांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. वयस्कर व्यक्तींसाठी ही स्थिती अत्यंत त्रासदायक असून अनेकांना शारीरिक त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

नवीन इमारत तयार असूनही ती वापरात न आल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाच्या कामांसाठी वेळ आणि श्रम वाया घालवावे लागत आहेत. सातबारा, फेरफार, जमिनीचे दाखले यांसारखी कामे वेळेत पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लोकप्रतिनिधी व शासन निद्रस्थ आहे की काय?..असा सवाल उठत आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन तलाठी कार्यालय सुरू करण्याची तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी तळमजल्यावर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन नवीन इमारत कार्यान्वित करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

0 Response to "तलाठी कार्यालय उदघाटनाच्या प्रतिक्षेत लोकप्रतिनिधी,शासन निद्रस्थ..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article