-->
खाजगी शाळांच्या मनमानीला लगाम घाला: वह्या-पुस्तकांच्या सक्तीविरोधात मनविसे आक्रमक, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन.

खाजगी शाळांच्या मनमानीला लगाम घाला: वह्या-पुस्तकांच्या सक्तीविरोधात मनविसे आक्रमक, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन.


• वाशिममध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक लूट थांबवा; विशिष्ट दुकानातून गणवेश खरेदीच्या सक्तीवर मनविसेचा आक्षेप.

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्युज नेटवर्क 

वाशिम :- वाशिम जिल्ह्यातील अनेक खाजगी शाळांमध्ये नर्सरी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. यासंदर्भात मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत रमेश शेटे यांनी आज जिल्हा शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जि. वाशिम यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, खाजगी शाळांकडून वही, पुस्तक, रजिस्टर व शालेय गणवेश विक्री तसेच विशिष्ट रेडीमेड दुकानातून खरेदीची सक्ती होत असून संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.मनविसेचे म्हणणे आहे की, सध्या सर्वसामान्य जनता आधीच पेट्रोल, डिझेलच्या टंचाईला तसेच गगनाला भिडलेल्या इंधन दरांना सामोरे जात आहे. त्यातच आर्थिक मंदीचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत असून घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शाळांकडून वही, पुस्तके, रजिस्टर व गणवेश खरेदीसाठी सक्ती केली जात असल्यामुळे पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. सदर वही, पुस्तके, रजिस्टर व गणवेश बाजारभावापेक्षा जास्त दराने विक्री करण्यात येत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.

 शासनाच्या नियमानुसार कोणतीही शाळा पालकांना विशिष्ट दुकानातून वही, पुस्तक किंवा गणवेश खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही. तरीही अनेक शाळांकडून खुलेआम नियमांचे उल्लंघन केले जात आहे. हा अत्यंत गंभीर विषय असून संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण विभागाचे लक्ष या प्रकाराकडे वेधले जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना न्याय मिळण्यासाठी मनविसेने कठोर कारवाईची मागणी केली आहे, संबंधित सर्व खाजगी शाळांची तात्काळ चौकशी करून शाळेमधून होणारी वही, पुस्तक, रजिस्टर विक्री बंद करावी. शाळेमधूनच वही, पुस्तक, रजिस्टर व इतर शैक्षणिक साहित्य विक्री केले जात आहे, ते थांबवावे. विशिष्ट रेडीमेड दुकानातून गणवेश खरेदीची सक्ती थांबवावी. पालकांना अमुक रेडीमेड दुकानावर शाळेचे कपडे व गणवेश मिळतील असे सांगून विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यासाठी दबाव टाकला जात आहे, तो प्रकार बंद करावा. दोषी शाळांवर शासकीय नियमानुसार कठोर कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर शिक्षण विभागाने दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे, पालकांना कोणत्याही दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे स्वातंत्र्य द्यावे. बाजारात उपलब्ध दर्जेदार व कमी किमतीचे साहित्य घेण्याचा अधिकार पालकांना मिळावा, या संदर्भात जिल्ह्यात विशेष तपास मोहीम राबवावी अशा विविध मागण्या कारण्यात आल्या.जेणेकरून भविष्यात पालकांची लूट होणार नाही.
मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत रमेश शेटे यांनी सांगितले की, विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी ही लढाई सुरूच राहील. शिक्षण विभागाने त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.यावेळी मनसे चे विध्यार्थी जिल्हाध्यक्ष श्री. गजानन कढणे, मनसे विध्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष श्री. अनिकेत शेटे, मनसे ता अध्यक्ष मालेगाव ज्ञानेश्वर गवळी, मनसे ता. उपाध्यक्ष मालेगाव श्री. रामेश्वर वाघ, मनसे ता. अध्यक्ष वाहतूक सेना श्री. गजानन ठाकरे, मनसे जिल्हाउपाध्यक्ष वाशिम उमेश टोलमारे, मनसे शहर उपाध्यक्ष वाशिम आकाश लोलप उपस्थित होते

0 Response to "खाजगी शाळांच्या मनमानीला लगाम घाला: वह्या-पुस्तकांच्या सक्तीविरोधात मनविसे आक्रमक, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article