३२ वेळा रक्तदान, हजारो रुग्णांना जीवनदान !..
शनिवार, 13 जून 2026
Comment
रक्तवीर-रुग्णमित्र जयेंद्र देशपांडे यांचा भव्य सामाजिक गौरव, निस्वार्थ समाजसेवा, रक्तदान, रुग्ण मदत आणि जनजागृतीच्या कार्याची राज्यस्तरावर दखल.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- निश्चल येनोरकर भंडाराः समाजसेवा हीच खरी पूजा मानत गेल्या अनेक वर्षांपासून रक्तदान, रुग्णसेवा, जनजागृती आणि गरजूंना मदतीचा हात देण्याचे कार्य अखंडपणे करणारे रक्तवीर-रुग्णमित्र जयेंद्र देशपांडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाबद्दल "सामाजिक कार्यकर्ता" म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव होताच सभागृहात उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या सेवाभावी कार्याला सलाम केला.
सामाजिक न्याय भवन, भंडारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुध्दीस्ट कल्चरल असोसिएशन तथा महाराष्ट्र एससी-एसटी प्राध्यापक असोसिएशन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य गौरव सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. देवेंद्र सोनटक्के, प्रा. डॉ. एन. व्ही. ढोके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रहार संघटना, भंडारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले जयेंद्र देशपांडे यांनी आतापर्यंत तब्बल ३२ वेळा रक्तदान करून अनेकांना नवजीवन दिले आहे. एवढेच नव्हे तर हजारो गरजू रुग्णांना वेळेवर रक्त
विन सोहळा
उपलब्ध करून देत त्यांनी "रुग्णमित्र" म्हणूनही जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
समाजप्रबोधनाच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. युवक युवती, नवविवाहित जोडपे आणि समाजातील विविध घटकांना भारतीय संविधान, महामानवांच्या विचारांची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराज आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या प्रतिमा भेट देत ते सामाजिक व ऐतिहासिक जाणीवा जागृत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत
आहेत. याशिवाय वृक्षारोपण, रुग्णांना फळांचे वाटप, गरजूंना ब्लँकेट वितरण, निराधारांना कपडे व रेशन उपलब्ध करून देणे अशा विविध
उपक्रमांमधून त्यांनी मानवतेचा दीप अखंड तेवत ठेवला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता ते सातत्याने समाजहितासाठी झटत आहेत.
जयेंद्र देशपांडे यांच्या कार्यामुळे युवकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होत असून समाजसेवेबाबत नवी प्रेरणा निर्माण होत आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत समाजातील अधिकाधिक युवकांनी सेवाकार्यात पुढे यावे, अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. "रक्तदानातून जीवनदान, सेवाभावातून समाजनिर्माण" हे ब्रीद प्रत्यक्ष कृतीतून साकार करणारे जयेंद्र देशपांडे आज भंडारा जिल्ह्यासाठी अभिमानाचे नाव ठरत आहेत.
0 Response to "३२ वेळा रक्तदान, हजारो रुग्णांना जीवनदान !.."
एक टिप्पणी भेजें