-->
महानुभाव पंथीय अनुयायांच्या जन आंदोलन व स्वाक्षरी अभियान.

महानुभाव पंथीय अनुयायांच्या जन आंदोलन व स्वाक्षरी अभियान.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
 न्यूज नेटवर्क 

 भंडारा :- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते भडोच ( गुजरात) येथील राजवाडा आज अन्य सांप्रदायिक लोकांच्या ताब्यात आहे. व जी जागा आम्हा महानुभाव पंथीयांची श्रद्धा स्थान आहे अशा पवित्र जागेवर अतिक्रमण होत आहे. या साठी श्री सुदर्शन बाबा कपाटे छत्रपती संभाजी नगर यांनी ही पवित्र वस्तूचे जतन व्हावे व ती महानुभाव पंथाच्या अनुयायांना मिळावी या साठी दिनांक 15/6/2026 वार सोमवार या दिवशी भडोच नगरीत मोठ्या प्रमाणात जन आंदोलन व स्वाक्षरी अभियान करण्यात येत आहे त्या साठी संपूर्ण भारतातुन हिंदू महानुभाव पंथीयांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या भडोच नगरीत जमा व्हावे. "तिरीप फाउंडेशन" छत्रपती संभाजी नगर चे मुख्य मार्गदर्शक श्री सुधाकरराव ढगे, श्री श्रीधरराव कपाटे, श्री दत्ता भाऊ बिडकर, तिरिप फाउंडेशन चे सचिव श्री कल्यानराव यादव,अध्यक्ष श्री मुरलीधरभाऊ शेवलीकर,उपाध्यक्ष श्री दिपकभाऊ कारंजकर तसेच महीला प्रतिनिधी सौ. वृषालीताई कल्याण यादव व सौ. वनिताताई मुरलीधर शेवलीकर यांनी भडोच येथे जाण्याबद्दल सवीस्तर चर्चा केली. व "तिरीप फाउंडेशन" छत्रपती संभाजीनगर चा या आंदोलनात सहभाग राहील व तीरीप फाउंडेशन चे अध्यक्ष यांनी आव्हान केले आहे. 

0 Response to "महानुभाव पंथीय अनुयायांच्या जन आंदोलन व स्वाक्षरी अभियान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article