-->
पत्रकारांना धमकावणाऱ्यांना थेट जेलची हवा !..

पत्रकारांना धमकावणाऱ्यांना थेट जेलची हवा !..


• पत्रकारांना धमकी म्हणजे लोकशाहीला आद्यात; दोषींना कोणतीही माफी नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
        न्यूज नेटवर्क 

मुंबई :- राज्यातील पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणान्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारांवरील हल्ले हे केबळ एखादघा व्यक्तीवरील हल्ले नसून लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकार आणि माध्यमे हे चौथे स्तंभ असून समाजातील विविध प्रश्न, जनतेच्या समस्या तसेच शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले, धमक्या किंवा टब्दाव टाकण्याचे प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत.

राज्य सरकार अशा घटनांकडे गंभीरपणे पाहत असून पत्रकारांना धमकावणाऱ्या किंवा त्यांच्या कामात अडथळा निर्माण करणान्या व्यक्तींना थेट तुरूंगाची हवा खावी लागेल, असा कठोर इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. तसेच पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे यासाठी आवश्यक संरक्षण आणि कायदेशीर मदत उपलव्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार संघटनांनी या भूमिकेचे स्वागत केले असून पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे.

0 Response to "पत्रकारांना धमकावणाऱ्यांना थेट जेलची हवा !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article