-->
अस्मितेचा एल्गार या संघटनेची चिंतन बैठक संपन्न.

अस्मितेचा एल्गार या संघटनेची चिंतन बैठक संपन्न.




• भिक्षू संघावर झालेल्या लाठी हल्याचा निषेध म्हणून ९ जून ला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा.

• आंबेडकर संघटना व भिकू संघ यांना उपस्थित राहण्याचे आव्हान.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
न्यूज नेटवर्क 
 
भंडारा : - कल्याणमधील वालधुनी येथे आपल्या पूजनीय भिक्षू संघावर प्रशासनाने चालवलेल्या लाठ्या, रस्त्यावर सांडलेले त्यांचे रक्त आणि बुद्धभूमीवर चाललेला बुलडोझर... हा केवळ एका जागेवरील हल्ला नाही, तर हा थेट आपल्या सामाजिक अस्मितेवर आणि बौद्ध धम्माच्या स्वाभिमानावर झालेला क्रूर हल्ला आहे.....!
अशा वेळी शांत बसणे म्हणजे आपल्या समाजावरील होणाऱ्या अन्यायाला मूक संमती देणे होय.
भंडारा जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास हा नेहमीच शासन व्यवस्थेला झुकविण्याचा आणि अन्यायाची छाती फाडून "न्याय "खेचून आणण्याचा राहिला आहे.

याच धगधगत्या भावनेतून, कल्याणच्या या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी दिनांक 4 जून 2026 रोजी भंडारा येथील अस्मितेचा एलगार कार्यालयात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची एक तातडीची विशेष बैठक पार पडली.
या विशेष बैठकित एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे की, या अन्यायाविरुद्ध भंडाऱ्यातून अशी ठिणगी पडली पाहिजे ज्याची धग थेट मुंबई आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचली पाहिजे.
भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त नेतृत्वात सदर प्रकरणाबाबत भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना दिनांक 9 जून 2026 रोज मंगळवार ला सकाळी 11.00 वा.एक वादळी निवेदन देण्याचे सर्व संमतीने ठरविण्यात आले.
आपण क्रांतिसुर्य बाबासाहेबांचे वंशज आहोत, ज्यांनी अन्यायाविरुद्ध नेहमीच वज्रमुठ आवळली आणि आपल्याला लढा देण्याची शिकवण दिली.
ज्या समाजाने खैरलांजीच्या अन्यायाविरुद्ध अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून सोडले होते, तोच स्वाभिमानी लढाऊ आंबेडकरी बाणा पुन्हा एकदा दाखवून देण्याची वेळ आली आहे. हा लढा कोण्या एका व्यक्तीचा नाही, हा आपल्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा लढा आहे...
  9 जून रोजी आपल्या घरातील,गल्लीतील आणि गावातील प्रत्येक समाज बांधवाने, माता-भगिनींनी आणि तरुणांनी आपली सर्व कामे बाजूला ठेवून मोठ्या संख्येने अभूतपूर्व जनसमुदायाचा महासागर बनवून त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे उपस्थित राहावे. असे आवाहन सदर बैठकीतून करण्यात आले आहे.
सामाजिक चळवळीचे नेते मा. परमानंद मेश्राम, अचल मेश्राम, मदन पालजी गोस्वामी, मनोज खोब्रागडे,दिलीप वानखेडे,मोरेश्वर गजभिये, सचिन गेडाम, प्रवीण कोचे, कैलास गेडाम, उमाकांत रामटेके,नाशिक चवरे, डॉ. देवानंद नंदागवळी, अरुण गोंडाने, सुरेंद्र बनसोड, हरकर उके,धनपाल गडपायले, सुनिल जीवनतारे, विलास मेश्राम, डी. जि. रंगारी, युगान्तर बारसागडे,शिलवन्त मेश्राम, सुभाष गवई, अमरदीप बोरकर,भागवत मेश्राम,रोशन फुले,रहीम मेश्राम,धनपाल गडपायले,श्रीराम बोरकर, अजित गजभिये, अमित वैद्य,नितेश डोंगरे, अंकित चव्हान, युगान्तर बारसागडे, विनायक हुमने, राहुल गजभिये,दिलीप बडोले, राजकुमार नदेश्वर,अनमोल रामटेके, आनंदराव शहारे, अमोल टेम्भूर्णे, धम्मा वासनिक,सचिन गजभिये, अमित श्यामकुवर, राहुल श्यामकुवर, विशाल घरडे, सम्यक गजभिये, त्रिरत्ना नेवारे,पवित्रा भोवते,प्रिया शहारे ,सुनीता टेम्भूर्णे, कुंदा उके, मंजूताई गजभिये, अमरदीप बोरकर, देवा वैरागडे, सुधीर खोब्रागडे,चंदन राऊत, भजनदास मेश्राम,राजन मेश्राम,तसेच लाखांदूर तालुका बि. एस. एस. पदाधिकारी व कार्यकर्ता गण उपस्थित होते...
 ही सभा ज्येष्ठ नेते मा. चरण मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर सभेचे संचालन दिलीप वानखेडे ह्यांनी केले व आभार प्रदर्शन धनपाल गडपायले यांनी केले.

 टीप :- भंडारा जिल्ह्यातील,तालुक्यातील बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी यांनी भंतेजी यांना सोबत घेऊन येण्याची विनंती करण्यात येतं आहे.

0 Response to "अस्मितेचा एल्गार या संघटनेची चिंतन बैठक संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article