-->
स्वयपाकाचा गॅस पुन्हा महागला...

स्वयपाकाचा गॅस पुन्हा महागला...

• सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ,गृहणीचे बजट कोलमडण्याची शक्यता 

"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्यूज नेटवर्क.

मुंबई/नागपूर :- मध्य-पूर्वेतील तणाव आणि त्यातून निर्माण झालेली आआंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारातील अस्थिरता याचे परिणाम आता भारतात स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात इंधन दरांचा आलेख सातत्याने वर जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनंतर आता पुन्हा एकदा घरगुती स्वयंपाकाचा गॅस महागला आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे महिन्याचे बजेट आणखी कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ असून, त्यामुळे महागाईचा भार थेट सामान्य नागरिकांच्या खिशावर पडत असल्याचे चित्र दिसत आहे.

माहितीनुसार, तेल विपणन कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती उझऋसिलिंडरच्या दरात थेट २९ रुपयांची वाढ केली आहे. यामुळे सिलिंडरची किंमत ११२ रुपयांवरून ९४१ रुपयांपर्यंत वाढली आहे. ही दरवाढ देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये लागू करण्यात आली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसह देशभरातील ग्राहकांना आता नवीन दरानुसार सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.

0 Response to "स्वयपाकाचा गॅस पुन्हा महागला..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article