-->
महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या तृतीयपंथी यांच्या समस्या सोडविण्याकरिता.

महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या तृतीयपंथी यांच्या समस्या सोडविण्याकरिता.



पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांची जिल्हाधिकारी मार्फत अशासकीय सदस्य म्हणून निवड.

हर्षवर्धन देशभतर 
"साप्ताहिक जनता की आवाज 

भंडारा :- महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागामार्फत तृतीयपंथी यांच्या समस्यांना वाचा फोडण्याकरता व त्यांचे निराकरण करण्याकरता भंडारा जिल्ह्यातील पहेला येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांची भंडारा जिल्हाधिकारी मार्फत जिल्हा समितीवर अशासकीय समिती म्हणून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत . समाज कल्याण ऑफिस भंडारा मार्फत तृतीयपंथीय लोकांचे कल्याण करण्याकरता व त्यांचे प्रश्न उचलण्याकरता जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करण्यात आली आहे जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्या लेखी पत्रकानुसार त्यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र शासन डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त डी जी रंगारी,साप्ताहिक जनता की आवाज चे मुख्य संपादक श्रीकृष्ण देशभरात, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्ण, पंकज वानखेडे, रोशन जांभुळकर ,विलास बांडेबुचे, सुरेश बांडेबुचे, कुलदीप गंधे,हर्षवर्धन देशभर युवा कार्यकर्ता. व इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अभिनंदन केल.

0 Response to "महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागाच्या तृतीयपंथी यांच्या समस्या सोडविण्याकरिता."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article