गोबरवाही पोलिसांची रेतीवाहतुकीवर कारवाई.
गुरुवार, 25 जून 2026
Comment
• १३ लाख १२ हजारांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात.
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- तालुक्यातील गोबरवाही पोलिसांनी अवैध रेतीउपसा आणि वाहतुकीविरोधात जोरदार मोहीम उघडली. देवनारा गावशिवारात केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एकूण १३ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून दोन्ही चालकांना ताब्यात घेतले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोबरवाही पोलिसांचे पथक गस्तीवर असताना देवनारा शिवारात रेतीची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून पहिली कारवाई केली. यामध्ये आरोपी अभिषेक कृष्णा शेरकी (२५, रा. रोंघा, ता. तुमसर) हा महिंद्रा ट्रॅक्टर-ट्रॉलीतून विनापरवाना रेती नेताना आढळला. त्याच्याकडून
ट्रॅक्टर आणि १ ब्रास रेतीसह ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर दुसऱ्या कारवाईत आरोपी अमन अमरलाल धुर्वे (२९, रा. खापा, ता. तुमसर) याला सोनालिका ट्रॅक्टरमधून रेतीवाहतूक करताना रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून १ ब्रास रेतीसह ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपींवर गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर
भारतीय न्यायसंहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कडक कलमांनुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे व पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रोडे, पोलीस शिपाई उईके आणि पथकाने केली. या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
0 Response to "गोबरवाही पोलिसांची रेतीवाहतुकीवर कारवाई."
एक टिप्पणी भेजें