-->
उल्हासनगरात प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन; शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

उल्हासनगरात प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन; शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.


सोनु संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
उल्हासनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उल्हासनगर-४ येथील कुर्ला कॅम्प परिसरात श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने प्रथमच भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विकास सामाजिक संस्थेचे संघटक सुधीर कन्हेरे, हनुमान व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष अनिल पावसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अंबरनाथ जिल्हा प्रचार प्रमुख प्रशांत बुटरे उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, कर्तृत्व, स्वराज्य स्थापनेतील योगदान आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन रविंद्र मिंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शाम छाबरिया, शेखर कोल्हे, सुनील डुंबरे, यतिन डुंबरे, संदीप डुंबरे, जयदेव छाबरिया, विनोद मिंडे, प्रमोद मिंडे, संजय बलकवडे, शांताराम फटांगारे, प्रकाश दोडेजा यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णासाहेब खतोडे यांनी केले.
दरवर्षी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा यंदा उल्हासनगरात प्रथमच आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी श्रीराम मित्र मंडळाचे कौतुक केले.
जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे! जय महाराष्ट्र! 🚩

0 Response to "उल्हासनगरात प्रथमच शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन; शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article