भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली एक जखमी.
सोमवार, 1 जून 2026
Comment
गणेश सोनपीपंळे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अर्जुनी मोरगाव :- नवेगावबांध-कोहमारा सिमेंट रोडवरील स्कॉय बारसमोर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकी आदळली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २९ मे रोजी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारासची आहे. अक्षय शालिकराम लंजे (२५) रा. बोंडे/खोली, नवेगावबांध असे जखमी तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर चालक ट्रक सोडून पसार झाला असून याप्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी फरार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सविस्तर असे की, ट्रक MP.09 HH 7078,
क्र. एम. पी. - ०९/ एएचएच -७०७८ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून सिमेंट रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभा करून ठेवला होता. पार्किंग लाईट चालू असली तरी पद्धत चुकीची असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना त्याचा अंदाज येत नव्हता. यादरम्यान स्कूटीने जाणाऱ्या अक्षय लंजे याला ट्रक न दिसल्याने त्याची ट्रकला जोरदार
धडक बसली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अक्षयला सोडून चालक ट्रकसह घटनास्थळावरून पळून गेला. या संदर्भात फिर्यादी प्रदीप नरेश रणदीवे (३७) रा. इंदिरानगर यांच्या तक्रारीवरून नवेगावबांध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश मेश्राम करीत आहेत.
0 Response to "भरधाव दुचाकी ट्रकवर आदळली एक जखमी."
एक टिप्पणी भेजें