सामाजिक तेढ टाळण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बैठक घ्या - दिपक केदार.
गुरुवार, 11 जून 2026
Comment
ऑल इंडिया पँथर सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
बीड :- अनुसूचित जाती उपवर्गीकरणावरील संदिग्धता दूर करण्यासाठी बाळासाहेब आआंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी अनुसूचित जाती (ड3) उपवर्गीकरणाच्या मुद्यावर राज्यात निर्माण झालेल्या संभ्रम आणि सामाजिक अस्वस्थता दूर करण्यासाठी ऑल इंडिया पंवर सेनेने महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात बदर समिती अहवालासंदर्भातील शंका दूर करण्यासाठी आदरणीय ड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने सर्वपक्षीय च समाजप्रतिनिधींची बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, उपवर्गीकरणासाठी आधारभूत असलेल्या बदर समितीच्या अहवालाबाबत विविध स्तरांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे अनुसूचित
जाती समाजात संभ्रम, अस्वस्थता वाढली असून सामाजिक तेढ, द्वेष आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभर उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात आंदोलने सुरू असल्याने काही ठिकाणी दंगलसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. पारदर्शक चर्चेची मागणी ऑल इंडिया पंवर सेनेने विनंती केली आहे की, मंत्रालयात आयोजित करण्यात येणान्या बैठकीत बदर समिती अहवाल, त्याचे आधार, निकष, लोकसंख्याविषयक आकडेवारी तसेच शासनाची भूमिका याबाबत पूर्ण पारदर्शक माहिती सादर करण्यात बाबी, बामुळे समाजातील संदिग्धता दूर होऊन सामाजिक सौहार्द राखण्यास मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाची माहिती ऑल इंडिया पंधर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या बतीने देण्यात आली. राज्य प्रवक्ते तथा
बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे बांनी प्रसार माध्यमांना याची माहिती दिली. ऑल इंडिया पंथर सेनेने राज्यातील वाढती सामाजिक अस्वस्थता लक्षात घेता या विषयाकडे गांभीयनि लक्ष द्याचे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
0 Response to "सामाजिक तेढ टाळण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बैठक घ्या - दिपक केदार."
एक टिप्पणी भेजें