-->
जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने नरेंद्र मेश्राम सन्मानित.

जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने नरेंद्र मेश्राम सन्मानित.



हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा :- महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात (मंगळ. ०९ जून) ला पहेला भंडारा येथे महाराष्ट्रातील नामवंत अतिथींच्या हस्ते पत्रकार नरेंद्र मेश्राम यांना जिल्हा स्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सत्कार गौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी खासदार डॉ.

खुशाल बोपचे म्हणाले की, "आजच्या काळात निर्भिड पत्रकारीच करावी, आज जर सोशल मिडीया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते, म्हणून सामाजिक प्रसारमाध्यमांवर आज भारतात विशेष लक्ष दिले जात आहे" असे प्रभावशाली प्रतिपादन केले. पहेला (भंडारा) येथे संपादक, ज्येष्ठ पत्रकार संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त "सन्मान द्या सन्मान घ्या" हा भरगच्च कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर उदघाटक माझा

आजच्या काळात निर्भिड पत्रकारी करावी माजी खा. डॉ. खुशाल बोपचे

मराठवाडा, छत्रपती संभाजीनगरचे संपादक दशरथ सुरडकर, अध्यक्ष माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, अतिथी चित्रपट अभिनेते अश्विन वघाले, अभिनेत्री चैताली भस्मे, प्रसिद्ध नृत्यांगना वैशाली मडावी,

", माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, व अभिष्टचिंतन सत्कारमूर्ती संजीव भांबोरे, पुणे संपादक प्रकाश सोनवणे आदी मान्यवर हजर होते. येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, प्रबोधनकार, महिला सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी खा. डॉ. खुशाल बोपचे म्हणाले की, आजच्या भयंकर गैरव्यवहारीय, भ्रष्टाचार फोफावलेल्या काळात निर्भिड पत्रकारीच करावी. आज

जर सोशल मिडीया नसता तर जग एक पाऊल पुढे नसते. एका सेकंदात जागृत नागरिक सोशल मिडीयातून अन्याय, गैरव्यवहार, भ्रष्टाचार जनतेसमोर उघडकीस करीत आहे" असे प्रभावशाली प्रतिपादन केले. यावेळी संपादक संजीव भांबोरे म्हणाले की, हा कार्यक्रम माझा एकट्याचा नाही, तर माझ्या वाढदिवसाला गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवर, कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार हे सन्मानित झाले पाहिजे असे प्रतिपादन केले. असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. या अभिनव सोहळ्याला संचालन न्यूज प्रवक्ता संजना भांबोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संपादक श्रीकृष्ण देसभ्रतार यांनी केले

0 Response to "जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने नरेंद्र मेश्राम सन्मानित."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article