-->
पावसाचा पॅटर्न बदलणार, दुष्काळ अन उष्णतेची लाट !..

पावसाचा पॅटर्न बदलणार, दुष्काळ अन उष्णतेची लाट !..


• अल निनोचा प्रभाव वाढवणार जगाचं टेन्शन, हवामान संघटनेची चिंताजनक भविष्यवाणी.

"साप्ताहिक जनता की आवाज" 
         न्यूज नेटवर्क 

भंडारा :- देशभरात यंदा उष्णतेच्या लाटेने नागरिकांना हैराण केल्याचं पाहायला मिळालं. मान्सूनच्या आगमनादेखील विलंब झाल्याने उष्णतेने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत असतानाच जागतिक हवामान संघटनेकडून (WMO) चिंता वाढवणारी माहिती देण्यात आली आहे. जगभरात वातावरण बदलामुळे मोठं संकट निर्माण झालं असून अल निनोच्या सक्रियतेबाबत वैज्ञानिकांकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अल निनोचा प्रभाव वेगाने वाढण्याची शक्यता असून परिणामी मान्सून पंटर्न बदलणार आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत अल निनोचा प्रभाव तयार होण्याची शक्यता ८० टक्‌यांपर्यंत असून नोव्हेंबर

महिन्यापर्यंत अल नीनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो. वातावरणीय बदलामुळे अल निनोचा परिणाम अधिकच तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे काही मागांमध्ये दुष्काळ, उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचा सामना करावा लागू शकतो. जनसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा अल निनो हा दर दोन ते सात वर्षांनी तयार होणारा वातावरणाचा पॅटर्न आहे. या स्थितीत प्रशांत महासागराचे पाणी गरम होते, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ होते आणि पावसाचा पॅटर्नही बदलून जातो. शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, पृथ्वीचे तापमान अलीकडच्या काळात १.३ अंश सेल्सिअसने वाढलं असून यामुळे अल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अल निनो आणि तापमानवाढीमुळे उष्णतेची लाट, दुष्काळ, अतिवृष्टी आणि जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे. दरम्यान, यंदा अल निनोचा प्रभाव मान्सूनच्या आगमनावर झालेला असतानाच पुढील वर्षी आणखी विदारक परिणाम पाहायला मिळू शकतात. २०२७ हे आतापर्यंतचं सर्वांत उष्णतेचं वर्ष ठरण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे.

0 Response to "पावसाचा पॅटर्न बदलणार, दुष्काळ अन उष्णतेची लाट !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article