पहेला येथे भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; चित्रपट अभिनेत्री चैताली भस्मे यांची प्रमुख उपस्थिती.
गुरुवार, 11 जून 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/पहेला :- "सन्मान द्या व सन्मान घ्या" या सामाजिक उपक्रमांतर्गत आयोजित भव्य सत्कार सोहळा, गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपत्र झाला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाला प्रख्वात चिन्नपट अभिनेत्री चैताली भस्मे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात चैताली भस्मे यांनी समाजातील महिलांची भूमिका, संस्कार, शिक्षण आणि आत्मनिर्भरतेचे महत्त्व यावर प्रभावी विचार व्यक्त केले. समाजाच्या उनतीसाठी प्रत्येकाने सकारात्मक योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
पुरस्कारांचे वितरण
या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणान्या 80 सामाजिक कार्यकर्ते व 4 गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सत्कारमुतींना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक पत्रकार संजीव भांबोरे व त्यांच्या सहकान्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.
0 Response to "पहेला येथे भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न; चित्रपट अभिनेत्री चैताली भस्मे यांची प्रमुख उपस्थिती."
एक टिप्पणी भेजें