तुमसर नगरपरिषदेचा कारभार प्रभारींच्या हाती.
शुक्रवार, 12 जून 2026
Comment
• नागरी समस्यांमुळे नागरिक आक्रमक.
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
तुमसर :- शहरातील रखडलेली विकासकामे, प्रभारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे तुमसर नगरपरिषदेच्या कारभारावर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सद्यःस्थितीला पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्तेदुरुस्ती आणि आरोग्यासारख्या मूलभूत सेवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अशातच विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही लोकप्रतिनिधी शहराबाहेर पर्यटनासाठी गेल्याची चर्चा सुरू असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेला कायमस्वरूपी
मुख्याधिकारी नसल्याने संपूर्ण कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे प्रशासकीय निर्णय, विविध विभागांतील प्रस्ताव आणि मंजुरी प्रक्रियांना अपेक्षित गती मिळत नसून कामांना मोठा विलंब होत आहे. तसेच शहरातील काही भागांत बांधकाम नियमांचे उल्लंघन होत असून प्रशासनाने याची पडताळणी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेच्या घनकचरा डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले होते. मात्र आगीच्या चौकशीची
तुमसरकरांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काही नगरसेवक शहराबाहेर असले तरी त्यांच्या प्रभागातील कामांवर त्यांचे लक्ष आहे. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत आवश्यक सूचना दिल्या जाताहेत. नागरिकांची सेवा आणि शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
इंजि.सागर गभने,
नगराध्यक्ष,
नगरपरिषद, तुमसर
सद्यःस्थिती, नुकसानाचे अंतिम मूल्यांकन आणि जबाबदारी निश्चितीबाबत अद्याप कोणतीही माहिती सार्वजनिक न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे जनतेतून थेट निवडून आलेले नगराध्यक्ष इंजि. सागर गभने हे प्रभागांना भेटी देऊन समस्या सोडविण्याचा प्रयत्न करताहेत. या संपूर्ण प्रकरणावर नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रभारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाच्या अभावामुळे नगरपरिषदेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी काळात प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शहरवासीय व्यक्त करीत आहेत.
0 Response to "तुमसर नगरपरिषदेचा कारभार प्रभारींच्या हाती."
एक टिप्पणी भेजें