-->
दर महिन्यात वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप; वीजदराचा पुनर्विचार व ५०० युनिट पर्यंत सुट करण्याची मागणी.

दर महिन्यात वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप; वीजदराचा पुनर्विचार व ५०० युनिट पर्यंत सुट करण्याची मागणी.



 कुलदीप गंधे  
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा दि. 27 जून 2026 :- जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये या महिन्यात ग्राहकांना नेहमीपेक्षा जास्त वीजबिले आल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर आर्थिक भार वाढला असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
सध्या 0 ते 100 युनिटपर्यंत ₹3.96 प्रति युनिट, तर 101 ते 300 युनिटपर्यंत ₹10.80 प्रति युनिट दर आकारला जात असल्याने 100 युनिटची मर्यादा ओलांडल्यानंतर वीजबिलात मोठी वाढ होत असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. त्यामुळे 300 युनिटपर्यंत वीजदर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
तसेच, या महिन्यात आलेल्या वाढीव वीजबिलांची तपासणी करून, चुकीची बिले तातडीने दुरुस्त करावीत व वीजदर रचनेचा पुनर्विचार करावा,तसेच एखाद्या सामान्य ग्राहकांनी इलेक्ट्रिक बिल तीन महीने भरला नाही तर ऑटोमैटिक लाईन बंद होते व पूर्ण बिल भरल्याशिवाय लाईन सुरु होत नाही जर एखादे सर्व साधारण व्यक्ती असेल तर तो काय?.करणार..बिल भरेल की आपला उदरनिर्वाह करेल असा सामान्य नागरीकात प्रश्न निर्माण झाला त्यामुळे महावितरण कंपनी ने ग्राहकांना विज बिलात ५०० युनिट पर्यंत सुट देण्याची शहरी व ग्रामीण स्तरावर मोठ्या संख्येने नागरिकांनी मागणी राज्य शासन, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग आणि महावितरणकडे केली आहे.

0 Response to "दर महिन्यात वाढीव वीजबिलांमुळे ग्राहकांमध्ये संताप; वीजदराचा पुनर्विचार व ५०० युनिट पर्यंत सुट करण्याची मागणी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article