कालकथित सुभाष विष्णू घोडके यांचा द्वितीय स्मृतिदिन कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रम सणसवाडी येथे साजरा.
रविवार, 7 जून 2026
Comment
• वृद्धाश्रमात स्मृतिदिन साजरा करणे लाख मोलाचे कार्य - पं.स सदस्या कोमलताई ढेरंगे
विश्वनाथ घोडके/संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
सणसवाडी :- पुणे जिल्हा पूर्वचे वंचित बहुजन आघाडीचे संघटक,पत्रकार,बौध्दाचार्य विश्वनाथ घोडके यांचे वडील कालकथित सुभाष विष्णू घोडके यांचा द्वितीय स्मृतिदिन कृपा फाउंडेशन संचलित "मानस वृद्धाश्रम" सणसवाडी येथे वृद्धांना अन्नदान व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी शिरूर पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या कोमल ताई ढेरंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्ता भाऊ हरगुडे,सणसवाडी नगरीचे मा उपसरपंच राजू आण्णा दरेकर, प्रारंभ सोसायटीचे चेअरमन तथा सणसवाडीचे मा उपसरपंच नवनाथ शेठ हरगुडे, बुद्धिष्ट मुव्हमेंट सेंटर सणसवाडी चे अध्यक्ष सुनील अण्णा पवार यांनी आश्रमात वृद्धांच्या करण्यात येणाऱ्या सेवेबद्दल कौतुक केले तसेच वृद्धांची सेवा करणाऱ्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.तसेच कालकथित सुभाष विष्णू घोडके यांना आदरांजली वाहिली.
कालकथित सुभाष विष्णू घोडके यांचे पुत्र विश्वनाथ घोडके यांनी आपल्या वडिलांच्या कार्याला उजाळा दिला.सुभाष विष्णू घोडके हे आंबेडकरी चळवळीतील जलसाकर म्हणून श्रीगोंदा तसेच आसपासच्या तालुक्यांमध्ये ओळखले जात.तसेच ते एकतारी भजनाचे दिग्गज म्हणूनही ओळखले जात.पुणे आकाशवाणी केंद्र येथे सकट बाबा आणि त्यांनी अनेक भजने गायली आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खेडोपाडी पोहचविण्याचे कार्य त्यांनी आपल्या गायनातून व भजनातून शेवटपर्यंत केले.शांत व प्रेमळ स्वभाव,मनात सर्वांविषयी आपुलकी प्रेम ही त्यांची खास वैशिष्ट्य.प्यारिलीस झालेला असतानाही सहा डिसेंबरला दरवर्षी नित्यनियमाने मुंबई येथे आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी जाणे या गुणांमुळे समाज बांधवांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.आज जाऊन त्यांना दोन वर्ष पूर्ण झाले तरी त्यांचे विचार अजूनही जिवंत आहेत.
यावेळी शिरूर पंचायत समितीच्या विद्यमान सदस्या कोमल ताई ढेरंगे,शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्ताभाऊ हरगुडे,सणसवाडी नगरीचे मा उपसरपंच राजू आण्णा दरेकर,प्रारंभ सोसायटीचे चेअरमन तथा सणसवाडी नगरीचे मा उपसरपंच नवनाथ शेठ हरगुडे, बुद्धिष्ट मूव्हमेंट सेंटर सणसवाडी चे अध्यक्ष सुनील अण्णा पवार,माजी सरपंच नवनाथ हरगुडे,निळ वादळ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा दिपिका ताई भालेराव,सामाजिक कार्यकर्त्या राणीताई जगताप, लक्ष्मी ताई जाधव,ज्ञान प्रकाश बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण,किरण आबा हरगुडे, युवा उद्योजक सूरज सोंडे,पत्रकार अंकुश मामा घारे,वंचित बहुजन आघाडीचे सणसवाडी अध्यक्ष तुकाराम मोरे, लक्ष्मी माता गोरक्षक ट्रस्टचे अध्यक्ष साहिल भालेराव,तक्षशिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मोतीराम निकुंभ,सचिव मालोजी भेदेकर,सल्लागार विष्णू इंगळे,राहुल रायभोळे,सागर आगवणे,गौतम मोरे,शेतकरी पुत्र राजेंद्र नवले,ज्ञानेश्वर खरात,विजय झडते,अनिल साळवे,भीम सैनिक मित्र मंडळ शिक्रापूर चे अध्यक्ष सारंग आल्हाट व त्यांचे सहकारी,शुभम अवथरे, सत्यपाल खिराडे,सुभाष सोनवणे,आप्पा कांबळे,सूरज मुंडे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "कालकथित सुभाष विष्णू घोडके यांचा द्वितीय स्मृतिदिन कृपा फाउंडेशन संचलित मानस वृद्धाश्रम सणसवाडी येथे साजरा."
एक टिप्पणी भेजें