-->
प्रबोधनकार भीम शहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांना.

प्रबोधनकार भीम शहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांना.


• कर्तव्यदक्ष आदर्श समाज प्रबोधनकार पुरस्कार -2026 सन्मानित. उपसंपादक महाराष्ट्र : प्रदीप कडबे

        हर्षवर्धन देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- तालुक्यातील ग्राम पहेला येथे सन्मान द्या सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी मंगळवार दिनांक-9 जून 2026 ला सकाळी 11 वाजता, सम्यक बुद्ध विहार, पहेला या ठिकाणी विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या सत्कार, गुणवंत विद्यार्थी सत्कार, सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक - दैनिक माझ्या मराठवाडा वर्तमानपत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ओबीसी बहुजन

महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार खुशाल बोपचे उपस्थित होते, प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री चैताली भस्मे, अभिनेता अश्विन कुमार वघाले, वैशाली मडावी, ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सिंग राजपूत, प्रकाश सोनवाने, ब्लू स्टार न्युज चैनल चे मुख्य संपादक रोशन जांभुळकर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, सरपंच शिवशंकर मुंगाटे अद्याळ, अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश पारधी, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे, प्रबोधनकार भीमशाहीर सदानंद मोरे, प्रबोधनकार उमेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार -

विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार, बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या बुलंद आवाज सुप्रसिद्ध गायक बागवान कडबे यांचा सामाजिक, कलाक्षेत्रातील, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन कर्तव्यदक्ष आदर्श समाज प्रबोधनकार पुरस्कार -2026 प्रमाणपत्र, शाल, मानाच्या सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी 11 प्रदीप फेटा, प्रबोधनकार भावेश कोटांगडे, प्रबोधनकार तनुजा नागदेवे, न्यूज

प्रभात चॅनलचे पत्रकार पंकज रा हांगडाले, शाहीर श्रीकांत नागदेवे भिमशाहिर सदानंद मोरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पत्रकार संजीव भांबोरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन - संजना भांबोरे तर आभार श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी केले. गायक कलावंत समाज बांधव गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "प्रबोधनकार भीम शहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे यांना."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article