समाजसेवक तथा गायक मुकेश गोपीचंद गजभिये यांना " डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड -2026 दिल्ली येथे जाहीर.
बुधवार, 29 जुलाई 2026
Comment
प्रदीप कडबे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- मौदा तालुक्यातील खात येथील बुद्ध फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते समाजसेवक तथा गायक मुकेश गोपीचंद गजभिये यांच्या सामाजिक, ग्रंथालय, कला, क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन " डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशीप अवार्ड -2026 दिल्ली नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम दिल्ली येथे १२ डिसेंबर 13 डिसेंबर 2026 रोजी आयोजित अकादमीच्या 42 व्या राष्ट्रीय अधिवेशनात पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक - डॉक्टर एस. पी. सुमन अक्षर, भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्ली यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. साहित्यिक गझलकार मधु बावलकर यांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "समाजसेवक तथा गायक मुकेश गोपीचंद गजभिये यांना " डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप अवार्ड -2026 दिल्ली येथे जाहीर."
एक टिप्पणी भेजें