-->
27 जुलै रोजी उपवर्गीकण विरोधात रिपाईचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने.

27 जुलै रोजी उपवर्गीकण विरोधात रिपाईचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने.

  


"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्त प्रतिनिधी

ठाणे (प्रतिनिधी) :- दि. 24 जुलै  केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती अ, ब, क, ड, उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाच्या ठाणे जिल्हाच्या वतीने दि. 27 जुलै रोजी दुपारी 2.00 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे.
या बाबत नियोजनासाठी शासकीय विश्रामगृह ठाणे येथे रिपब्लिकन पार्टीच्या ठाणे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग यांचे आदेशानुसार ठाणे प्रदेश अध्यक्ष आण्णासाहेब रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

अनुसूचित जाती अ ब क ड उपवर्गीकरणाला विरोध करणे या प्रमुख मागणीसह दिल्ली येथील जंतर मन्तर येथील विद्यार्थांच्या आंदोलनात झालेल्या लाठीमाराची चोकशी करण्यात यावी, नीट पेपरफुटी प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थांच्या पालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यावरील केसेस मागे घेण्यात याव्यात आदि मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी ठाणे यांना देण्यात येणार आहे.

ठाणे येथे झालेल्या बैठकीला रिपाईचे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग, महाराष्ट्र राज्य सह सचिव राहुल हंडोरे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे, ठाणे ग्रामीण अध्यक्ष संजय गायकवाड, सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, भिवंडी जिल्हा अध्यक्ष नगरसेवक महेंद्र गायकवाड, प्रमोद जाधव, ठाणे युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष तेजस जाधव, ठाणे सल्लागार जयवंत सोनवणे, ठाणे कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे, रामा कांबळे, महिला आघाडी ठाणे अध्यक्षा विमल सातपुते, उल्हासनगर अध्यक्षा आशा सोनावणे, ठाणेविभागीय अध्यक्षा संगीता गायकवाड, मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश उघडे,, विशाल ढेंगळे, अनुज जाधव, सुनील इंगळे, बाळा बनकर आदी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.

0 Response to "27 जुलै रोजी उपवर्गीकण विरोधात रिपाईचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article