-->
जिल्हा परिषद हायस्कूल व संस्कार कॉन्व्हेंट जांब येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती बिस्कीट वाटून उत्साहात साजरी.

जिल्हा परिषद हायस्कूल व संस्कार कॉन्व्हेंट जांब येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती बिस्कीट वाटून उत्साहात साजरी.




"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्तपत्र प्रतिनिधी.

मोहाळी/जांब :- दि. 25 जुलै 2026 : जिल्हा परिषद शाळा जांब व संस्कार कॉन्व्हेंट जांब येथे महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान प्रमेशभाऊ नलगोपुलवार यांनी विद्यार्थ्यांना स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक व विकासात्मक कार्याची माहिती देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

तसेच माजी पंचायत समिती सदस्य जगदीशभाऊ उके यांनी विद्यार्थ्यांना अजितदादा पवार यांच्या जीवनकार्याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रमेशभाऊ नलगोपुलवार (माजी ग्रामपंचायत उपसरपंच), जगदीशभाऊ उके (माजी पंचायत समिती सदस्य), दिवाकर बोरकर (माजी सरपंच), शुभम पिंगरे (सामाजिक कार्यकर्ता), प्रकाशभाऊ बोरकर, नामदेव बावनकुळे , ग्रामविकास अधिकारी लखन गलबले, दिलीप बालपांडे, संदीप सहारे, शुभम बालपांडे, साहिल लांजेवार, अभिषेक बाय, भूषण उईके यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी व गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

0 Response to "जिल्हा परिषद हायस्कूल व संस्कार कॉन्व्हेंट जांब येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती बिस्कीट वाटून उत्साहात साजरी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article